सीरिया - सीरियातील बंडखोरांच्या ठिकाणांवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात ११ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या उत्तर पश्चिमेकडील भागांमध्ये बंडखोरांची सरशी झाल्यानंतर सीरियन लष्कराने आक्रमक धोरण स्वीकारत महत्त्वाच्या ठिकाणांवर पुन्हा कब्जा मिळवला आहे.
रशियाच्या हवाई हल्ल्यात सीरियातील ११ नागरिकांचा मृत्यू; बंडखोरांना मागे ढकलण्यात यश - रशिया ड्रोन हल्ला
दमास्कस- अलेप्पो महामार्गावरील सराकीब या शहरावर सीरियन फौजांनी पूर्णपणे ताबा मिळवल्याचे युरोपातील 'सीरियन वॉर ऑब्झरवेटरी' संस्थेने सांगितले आहे.

दमास्कस- अलेप्पो महामार्गावरील सराकीब या शहरावर सीरियन फौजांनी पूर्णपणे ताबा मिळवल्याचे युरोपातील 'सीरियन वॉर ऑब्झरवेटरी' संस्थेने सांगितले आहे.
सीरियात सरकारच्या विरोधात बंड उभे राहिल्यामुळे अनेक दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. बंडखोरांमध्ये काही लष्कराचे सैनिकही सहभागी झाले आहेत. बंडखोरांविरोधातील लढाईत रशिया सीरियाला साथ देत आहे. तर निर्वासितांच्या लोंढ्यांना थोपविण्यासाठी तुर्कस्तानने या वादात उडी घेतली आहे. तुर्कस्तानचा काही बंडखोर गटांना पाठिंबा असून या वादात अनेक नागरिकांचा तसेच सैनिकांचा मृत्यू झाला आहे.