हैदराबाद - लंडन येथे एका भारतीय तरुणाचा एका अज्ञात व्यक्तीने चाकू भोसकून खून केला आहे. मोहम्मद नदीमुद्दीन, असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा हैदराबाद येथील रहिवासी आहे. नदीमुद्दीन हा गेल्या सहा वर्षांपासून लंडन येथे रहात होता. तो टेस्को सुपरमार्केट मॉल येथे काम करत होता.
लंडन येथे भारतीय तरुणाचा चाकू भोसकून खून - hyderabad
काम संपल्यावरही नदीमुद्दीन हा घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी टेस्को सुपरमार्केटच्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली. व्यवस्थापनाने सुरक्षा रक्षकाला नदीमुद्दीनचा शोध घेण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांना नदीमुद्दीनचा मृतदेह पार्कींगमध्ये आढळला.
लंडन येथे भारतीय तरुणाचा चाकू भोसकून खून
काम संपल्यावरही नदीमुद्दीन हा घरी आला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी टेस्को सुपरमार्केटच्या व्यवस्थापनाकडे चौकशी केली. व्यवस्थापनाने सुरक्षा रक्षकाला नदीमुद्दीनचा शोध घेण्यास सांगितले. सुरक्षा रक्षकांना नदीमुद्दीनचा मृतदेह पार्कींगमध्ये आढळला.
नदीमुद्दीनचा खून एका आशियाई व्यक्तीने केला आहे, असे नदीमुद्दीन याचा मित्र फहीम कुरेशी यांनी सांगितले. नदीमुद्दीनच्या कुटुंबियांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे याप्रकरणी मदत मागितली आहे.