महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

WHO Warned About Omicron : ओमायक्रॉनला गांभीर्याने घ्या, यातही मृत्यूची भीती आहेच - डब्ल्यूएचओचा इशारा - ओमायक्रॉन वरून जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होतायत आणि अनेकांचा जीवही जातोय असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस ( WHO director general Tedros Adhanom Ghebreyesus ) यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनला गांभीर्याने घेण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO warned about Omicron ) दिला आहे.

WHO Warned About Omicron
ओमायक्रॉनला गांभीर्याने घ्या, यातही मृत्यू होतायेत

By

Published : Jan 7, 2022, 2:16 PM IST

Updated : Jan 7, 2022, 3:35 PM IST

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) - डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन कमी गंभीर आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. ओमायक्रॉनमुळे लोक रुग्णालयांत दाखल होतायत आणि अनेकांचा जीवही जातोय असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस ( WHO director general Tedros Adhanom Ghebreyesus ) यांनी म्हटले आहे. ओमायक्रॉनला गांभीर्याने घेण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO warned about Omicron ) दिला आहे.

कोरोना रुग्णाचा इतर रुग्णावर परिणाम -

डब्ल्यूएचओ प्रमुख यांनी सांगितले की, मागील एका सप्ताहात कोरोना रुग्णसंख्या ही वाढली आहे. कोरोना वाढीचा दर इतका आहे की, रुग्णालयात बेड कमी पडत आहेत. याचा परिणाम हा जागतिक आरोग्य व्यवस्थेवर पडत आहे. रुग्णालयातील कोरोना रुग्णाच्या गर्दीचा परिणाम हा तेथील दुसऱ्या रुग्णावर पडत आहे. त्यामुळे दुसऱ्या रुग्णांना उपचार करण्यात उशीर होत आहे. तसेच ते म्हणाले की, रुग्णालयातील गर्दी कमी झाल्यानंतरच अशा रुग्णांच्या मृत्यूला टाळता येऊ शकते.

जागतिक लसीकरणाच्या असमानतेबाबत चिंता -

महासंचालक डॉक्टर टेड्रोस यांनी सांगितले की, जर परिस्थिती सुधारली नाही तर जगातील 109 देश जुलै 2022 च्या सुरूवातीपर्यंत 70 टक्के जनतेच्या लसीकरणाच्या लक्ष्यापासून मुकतील. त्यांनी जागतिक लसीकरणाच्या असमानतेबाबत देखील चिंता व्यक्त करत सांगितले की, ही मागील वर्षातील सर्वात मोठी तूटी आहे. काही देशाजवळ कोरोना महामारीशी लढण्यासाठी सुरक्षा उपकरणे, साहित्य आणि लसीची मुबलक प्रमाणात उपलब्धता आहे. मात्र काही गरीब देशाकडे आधारभूत सेवा सुद्धा नाहीत. यामुळे जागतिक आर्थिक सुधारणेला मोठा धक्का लागू शकतो.

IHU ची 12 जणांना लागण -

यातच, फ्रांस येथील मार्सिले येथील रुग्णालयात IHU Mediterrannee यांच्या नुसार, कॅमरुन येथून परत येत असलेल्या एका प्रवाश्याला कोरोना व्हायरसच्या एका नव्या व्हेरिएंट B.1.640.2 ची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. या नव्या व्हेरिएंटला IHU नाव देण्यात आले आहे. माहितीनुसार IHU संक्रमित कॅमरुन येथील नागरिकांने दक्षिण फ्रांस मधील 12 जणांना संक्रमित केले असल्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा -PM Security Breach : पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

Last Updated : Jan 7, 2022, 3:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details