महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोनावर चिनी डोस; सिनोफार्म लसीच्या वापरास जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी

चीनच्या सिनोफार्म या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे.  ही कोरोना प्रतिबंधात्मक लस यापूर्वीच चीनसह अन्य काही देशांनी वापरली आहे.

सिनोफार्म लसीच्या वापरास जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी
सिनोफार्म लसीच्या वापरास जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी

By

Published : May 8, 2021, 10:35 AM IST

जिनिव्हा - जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) चीनची कंपनी सिनोफार्मच्या कोविड लसीला आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. जागितक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळालेली चीन मधील ही पहिलीच कोरोना प्रतिबंधात्मक लस आहे.


डब्ल्यूएचओने सांगितले की, कोवॅक्स रोलआउट प्रमाणे सर्व देशांमध्ये चीनच्या सिनोफार्म या लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्यात आली आहे. ही कोरोना प्रतिबंधात्मक लस यापूर्वीच चीनसह अन्य काही देशांनी वापरली आहे. आता आरोग्य संघटनेने जगभरातील देशांना या लसीचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.

चीनमधील सिनोफार्म या लसीचा वापर चीनमध्ये करण्यात येत आहे. तसेच अन्य 42 देशांतील नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. यामध्ये इराक, इराण, मिस्र, पाकिस्तान, यूएई अशा देशांचा समावेश आहे.

यापूर्वी या लसींच्या वापरास परवानगी-

जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी विश्व फायजर आणि बायोएनटेक यांनी विकसित केलेल्या कोरोना लसीसह ऐस्ट्राजेनेका, जॉनसन अँड जॉनसन आणि मॉडर्ना या कोरोना लसींचा आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details