महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

US rejects Russia's claims : अमेरिकेने फेटाळला युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवल्याचा आरोप - RUSSIAL UKRAINE NEWS

अमेरिकेने युक्रेनला अर्थसहाय्यित रासायनिक आणि जैविक शस्त्रे ( chemical and biological weapons ) वापरल्याचा रशियाचा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र विभागाने बुधवारी सांगितले की, क्रेमलिन पूर्व युरोपीय देशात अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहे.

Russia's claims
Russia's claims

By

Published : Mar 10, 2022, 4:02 PM IST

वॉशिंग्टन : युक्रेनमध्ये अमेरिकेने रासायनिक आणि जैविक शस्त्रांचे अर्थसहाय्य घेतले, असे रशियाने केलेले आरोप फेटाळून लावले आहे. परराष्ट्र विभागाने बुधवारी सांगितले की, क्रेमलिन पूर्व युरोपीय देशात खोट्या अफवा पसरवत आहे.

कीवमध्ये यूएस-अनुदानित लष्करी जैविक गोष्टी काढून टाकल्याचा पुरावा मिळाल्याचे रशियाने म्हटले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी बुधवारी सांगितले की, युक्रेनच्या सैन्यानी प्लेग ( plague ), अँथ्रॅक्स ( anthrax) , कॉलरा (cholera ) आणि इतर प्राणघातक रोगांची विल्हेवाट लावली.

क्रेमलिन नियोजितपणे खोटे परसवतो

क्रेमलिन हेतुपुरस्सर खोटे पसरवत आहे. युनायटेड स्टेट्स आणि युक्रेन रासायनिक आणि जैविक शस्त्रास्त्रे चालवत आहेत. यूएस स्टेट डिपार्टमेंटने निवेदनात असे म्हटले आहे. स्टेट डिपार्टमेंटने असे उत्तर दिले की, रशिया अत्यंत चुकीची माहिती पसरवत आहे. "ही रशिया चुकीची माहिती पसरवत आहे." आणि रशियाने इतरदेशाविरूद्ध अशा खोट्या अफवा पसरवण्याची ही पहिलीच वेळ नाही. इतर देशांनी हे दावे अनेक वर्षांपासून वारंवार खोडून काढले गेले आहेत."

रशिया करतो कराराचे उल्लंघन

रशिया युक्रेनमधील कारवायांचे समर्थन करण्यासाठी कारणे शोधत आहेत. युनायटेड स्टेट्स युक्रेनमध्ये कोणत्याही रासायनिक किंवा जैविक प्रयोगशाळांची मालकी घेत नाही. आणि संबंधित नियमांचे पूर्ण पालन करत आहे. केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन आणि बायोलॉजिकल वेपन्स कन्व्हेन्शन अशा प्रकारची शस्त्रे विकसित केली नाही, असे स्टेट डिपार्टमेंट पुढे म्हणाले. रशियाकडे सक्रिय रासायनिक आणि जैविक शस्त्रे कार्यक्रम असल्याचा, युनायटेड स्टेट्सचा आरोप केला आहे. रासायनिक शस्त्रे करार आणि जैविक शस्त्रे कराराचे उल्लंघन करत आहेत.

हेही वाचा -Flight Hijacker Killed : एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण करणारा दहशतवादी पाकिस्तानमध्ये ठार

ABOUT THE AUTHOR

...view details