वॉशिंग्टन – कोरोनाच्या संकटातही जगभरात मर्दुमकी करणाऱ्या चीनबाबत अमेरिकने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाकडून (सीसीपी) धोका वाढत आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन युनियन तयार झाल्याची माहिती अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी दिली. ते जर्मनीमधील ब्रसेलच्या मंचावर बोलत होते.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांनी ट्विट करत चीनबद्दलची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले, की जर्मन मार्शल फंडाच्या ब्रुसेल मंचावर चर्चा करताना आज आनंद झाला. अमेरिका आणि युरोपियन युनियन हे चीनबाबत चर्चा करण्यात तयार झाल्याचे जाहीर करताना आनंद होत आहे. चीनचा कम्युनिस्ट पक्ष आपल्या सामान्य मुल्ये आणि जगण्याच्या पद्धतीला धोका निर्माण करत आहे.
गेल्या आठवड्यात युरोपियन युनियनचे प्रमुख राजदूत जोसेप बोर्रेल यांनी युरोप आणि अमेरिकेत चर्चा करावी, असे आवाहन केले होते. त्यामागे चीनबरोबर एकी व्हावी, असा बोर्रेल यांचा हेतू आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ म्हणाले, की चीनच्या धोक्याबाबत चिंता असताना नवीन यंत्रणेसाठी उत्साही आहे. चीनचा पश्चिम आणि सामाईक असलेल्या लोकशाहीच्या आदर्शाला धोका आहे. यावेळी त्यांनी भारताच्या सीमारेषेवर चीनच्या सैन्याकडून होणाऱ्या हल्ल्याचाही उल्लेख केला.
सीसीपीची वागणूक ही अमेरिकन लोकांच्या सुरक्षिततेच्या पायाला धोका निर्माण करणारी आहे. गेल्या दहा वर्षात प्रथमच डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन या धोक्याला गांभीर्याने घेत असल्याचे त्यांनी सांगितले. चिनी सैन्यदलाचा भारत, मलेशिया, इंडोनिशिया आणि फिलिपाईन्सला धोका वाढत आहे. त्यामुळे जगभरात सैन्यदल तैनात करण्याचा पुनर्विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.