नवी दिल्ली :ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांचा भारत दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती ब्रिटन सरकारने दिली आहे.
यापूर्वी १५ डिसेंबरला जॉन्सन यांनी पंतप्रधान मोदींचे आमंत्रण स्वीकारत, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निश्चित केले होते. त्यानंतर आपण या कार्यक्रमासाठी उत्सुक असल्याचेही जॉन्सन यांनी सांगितले होते. मात्र, आता भारत दौरा रद्द झाल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नाही.
दुसरे ब्रिटीश पंतप्रधान..
भारत स्वतंत्र झाल्यानंतर जॉन्सन हे ब्रिटनचे दुसरे असे पंतप्रधान होते ज्यांना दिल्लीमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मान मिळाला. यापूर्वी १९९३मध्य ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान जॉन मेजर यांना हा मान मिळाला होता.