क्यीव : युक्रेनच्या अध्यक्षीय कार्यालयाने ( Ukraine's Presidential office ) बेलारूसच्या सीमेवर रशियासोबत चर्चेसाठी एक शिष्टमंडळ पाठवल्याचे सोमवारी सांगितले आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना अण्वस्त्र सज्ज करण्याचे आदेश दिल्याने या दोन देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.
Ukraine Russia Talk : युक्रेनियन शिष्टमंडळ बेलारुसच्या सीमेवर करणार रशियाशी चर्चा - रशिया युक्रेन चर्चा
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( President Volodymyr Zelenskyy ) यांच्या कार्यालयाने तात्काळ युद्धविरामाची ( immediate cease-fire ) मागणी केली आहे. त्यांनी बेलारुसच्या सीमेवर रशियाशी ( Ukraine Russia Talk ) चर्चा करायला शिष्टमंडळ पाठवले आहे.
russia ukraine
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( President Volodymyr Zelenskyy ) यांच्या कार्यालयाने तात्काळ युद्धविरामाची मागणी केली आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ब्रिटन आणि पोलंड यांच्याशी चर्चा केली.