लंडन - इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गेल्या महिन्याच्या शेवटी संसदेला पाच आठवड्यांसाठी निलंबित केले होते. मात्र, इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने आज हे निलंबन बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.
इंग्लंडच्या संसदेचे निलंबन बेकायदेशीर - ब्रिटिश सर्वोच्च न्यायालय - Brexit deadline
२८ ऑगस्टला इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इंग्लंडच्या संसदेला पाच आठवड्यांसाठी निलंबित केले होते. मात्र, इंग्लंडच्या सर्वोच्च न्यायालयाने आज हे निलंबन बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा : पाकच्या पत्रकारावर ट्रम्प भडकले, असले पत्रकार कोठे भेटतात? इम्रान यांना केला उलटप्रश्न
३१ ऑक्टोबर ही ब्रेक्झिटची अंतिम मुदत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी हे स्पष्ट केले आहे, की त्या दिवशी युरोपियन युनियन मधून इंग्लंड बाहेर पडेल. सध्या निवडून आलेले बरेचसे संसद सभासद मात्र याला विरोध करत आहेत. त्यामुळे २८ ऑगस्टला जेव्हा जॉन्सन यांनी संसदेला पाच आठवड्यांसाठी निलंबित केले, तेव्हा इंग्लंमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले. त्यातच, हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा : 'बॉय विथ ट्रम्प अँड मोदी' : एका फोटोने 'सात्विक'ला केले स्टार