महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 24, 2020, 2:50 PM IST

ETV Bharat / international

ब्रिटनमध्ये करोनाचे थैमान; गेल्या 24 तासांत 744 जणांचा मृत्यू , तर 39 हजार बाधित

गेल्या 24 तासांमध्ये ब्रिटनमध्ये तब्बल 744 जणांचा मृत्यू झाला आहे. रोना रुग्णांची आकडेवारी तब्बल 21 लाख 55 हजार 996 वर पोहचली आहे. ब्रिटनच्या अनेक भागात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

यूके
यूके

लंडन -ब्रिटन आणि इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळला आहे. गेल्या 24 तासांमध्ये ब्रिटनमध्ये तब्बल 744 जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात मृत्यू होण्याची ही आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे. त्यामुळे ब्रिटनमधील एकूण मृत रुग्णांची संख्या 69 हजार 157 वर पोहचली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. ब्रिटनमध्ये काल कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली गेली 39 हजार 236 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांची आकडेवारी तब्बल 21 लाख 55 हजार 996 वर पोहचली आहे. ब्रिटनमध्ये लोकांना घरूनच काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ब्रिटनच्या अनेक भागात निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

प्रवाशांवर निर्बंध -

नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी बाळगण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर विविध देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारत, इराण, कॅनडा यांनी ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. अमेरिकेनेही बहुतांश बिगरअमेरिकी प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. सौदी अरेबिया, कुवेत आणि ओमान या देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

जगभर भीतीचे वातावरण -

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व देशांनी लॉकडाऊन केले होते. त्यानंतर सावरत असतानाच आणि कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असताना इंग्लंडमधील कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू आऊट ऑफ कंट्रोल असल्याचे ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांनी तेथील संसदेत सांगितले आहे

हेही वाचा -कोरोनाच्या प्रसारामुळे ब्रिटनहून भारतात येणारी विमानसेवा स्थगित

ABOUT THE AUTHOR

...view details