लंडन - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असताना आता इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. इंग्लडमध्ये 11 हजार पेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 558 जणांचा मृत्यू झाला आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण - कोरोना विषाणू
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाली आहे.
याआधी ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी करोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. शाही राजघराण्यातही करोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता पंतप्रधानांनाही करोनाची लागण झाली आहे. “गेल्या २४ तासांपासून मला कोरोनाची लक्षणे जाणवत होती. तपासणी केली असता सकारात्मक चाचणी आली. त्यामुळे मी स्वत:ला इतरांपासून वेगळे केले आहे. मात्र, मी व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जगभरामध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे आत्तापर्यंत 24 हजार 872 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच लाखापेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. इटलीमध्ये सर्वाधिक 8 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर इराण, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेतही मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. इटली आणि स्पेनमध्ये काल (गुरुवार) दिवसभरात प्रत्येकी 700पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला.