महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

बोरीस जॉन्सन आणि राजकूमार चार्ल्स यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि राजकूमार चार्ल्स यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ज्याप्रकारे रावणाचा पराभव झालो होता. त्याचप्रकारे आपणही कोरोनावर मात करू, असे बोरीस जॉन्सन म्हणाले.

बोरीस जॉन्सन आणि राजकूमार चार्ल्स
बोरीस जॉन्सन आणि राजकूमार चार्ल्स

By

Published : Nov 14, 2020, 3:05 PM IST

लंडन - यंदा कोरोनाच्या सावटाखाली देशभरात दिवाळी साजरी होत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि राजकूमार चार्ल्स यांनी शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. राजकूमार चार्ल्स यांनी एक व्हिडिओ जारी करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्याप्रकारे रावणाचा पराभव झाला होता, त्याचप्रकारे आपणही कोरोनावर मात करू, असे बोरीस जॉन्सन म्हणाले.

यावर्षीची दीपावली माझ्या 72 व्या जन्मदिवशी साजरी केली जात आहे. कोरोनामुळे लोक एकमेकांना भेटू शकत नाहीत, ही खेदाची बाब आहे. या अडचणीच्या वेळी मला आशा आहे की, दीपावलीच्या संदेशामुळे तुम्हाला शक्ती प्राप्त होईल. हा उत्सव अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे, असे चार्ल्स म्हणाले. चार्ल्स यांनी महामारीच्या काळात लोकांची सेवा केल्याबद्दल ब्रिटनमध्ये राहणाऱ्या हिंदू, शीख आणि जैन समाजातील लोकांचे कौतुक केले.

बोरीस जॉन्सन यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा भारतीयांना दिल्या आहेत. यंदाच्या दिवाळीला विशेष महत्त्व आहे. कारण, ज्याप्रमाणे भगवान रामाने रावणाला पराभूत केले. पत्नी सीताला घरी परत आणले आणि वाईटावर विजय मिळविला त्याचप्रमाणे माझा विश्वास आहे की, आपण कोरोना साथीवरही विजय मिळवू, असे जॉन्सन म्हणाले. याचबरोबर पंतप्रधान जॉन्सन यांनी लोकांना सतत हात धुणे, मास्कचा वापर करत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले.

हेही वाचा -जैसलमेरमधील जवानांसोबत पंतप्रधान मोदींची दिवाळी; म्हणाले सैनिक आहेत म्हणून देशात सण-उत्सव होतात

ABOUT THE AUTHOR

...view details