महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

नाटो चीनला रशियाप्रमाणे प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाही - बोरिस जॉन्सन - NATO

नाटो नेते चीनला प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाहीत. मला वाटत नाही, की या क्षणी कोणालाही , चीनबरोबर नवीन शीत युद्ध सुरू करायचे आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले.

बोरिस जॉन्सन
बोरिस जॉन्सन

By

Published : Jun 14, 2021, 9:13 PM IST

लंडन -सैन्य संघटना रशियाला ज्याप्रमाणे पाहते. त्याप्रमाणे नाटो नेते चीनला प्रतिस्पर्धी म्हणून पाहत नाहीत. तथापि, चीनच्या वाढत्या प्रभावाविषयी ते सावध आहेत, असे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले. नाटो शिखर परिषदेच्या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.

चीन आपल्या जीवनाचे वास्तव आहे आणि नाटोसाठी एक रणनीतिक विचार आहे. मला वाटत नाही, की या क्षणी कोणालाही , चीनबरोबर नवीन शीत युद्ध सुरू करायचे आहे. नाटोमधील राष्ट्रांची नेते आजची आव्हाने पाहत आहेत. एकत्रितपणे आव्हानांना सामोरे जाण्याची गरज आहे, असे बोरिस म्हणाले.

नाटोविषयी...

नाटोची स्थापना 1949 साली झाली होती. सोव्हिएत युनियनतर्फे होणारे हल्ले रोखणं हे त्याचे मूळ उद्दिष्ट होते. नाटोचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे आहे.

जी-7 नेत्यांनी चीनवर काय म्हटलं?

तत्पूर्वी, दोन दिवसांच्या जी -7 परिषदेच्या शेवटच्या दिवशी रविवारी, जगातील सात विकसित अर्थव्यवस्थांच्या नेत्यांनी चीनला झिनजियांग आणि हाँगकाँगमधील मानवाधिकारांचा आदर करण्याचे आवाहन केले. या बरोबरच नेत्यांनी कोरोनाच्या उत्पत्तीची निष्पक्ष चौकशीची मागणीही केली.

कोरोनाच्या उत्पत्तीविषयीच्या पारदर्शक चौकशीत संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेला सहकार्य करावे, असे आवाहन जी -7 देशांनी चीनला केले. तसेच चीनमधील तज्ज्ञांच्या अहवालाच्या शिफारशीनुसार, डब्ल्यूएचओच्या नेतृत्वात पारदर्शक, तज्ज्ञ-नेतृत्वाखाली आणि विज्ञान-आधारित चौकशी व्हावी, असे सात देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.

जी-7 शिखर परिषद...

12 आणि 13 जून रोजी जी-7 शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे ब्रिटनमध्ये दाखल झाले होते. अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच विदेश दौरा होता. जी-7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि अमेरिका यांचा समावेश आहे. जी-7 म्हणजेच सात देशांच्या गटाची समिट आहे. या परिषदेत विविध मुद्यांवर विचारमंथन केले जाते. यापूर्वी ही बैठक 2019 ला फ्रान्समध्ये भरली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details