महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ऑनलाइन फसवणुकीविरोधात यूके आणि भारतीय सुरक्षा दलांचे संयुक्त 'ऑपरेशन' - Online Fraud scam News

संगणकाशी संबंधित समस्या असल्याचे सूचित करणाऱ्या पॉप-अप संदेशांवर नमूद केलेल्या फोन नंबर्स किंवा वेबसाइटला भेट देऊ नये, असा इशारा पोलीस दल, दूरध्वनी सेवा प्रदाते आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांकडून लोकांना वारंवार दिला जात आहे. या सूचना न मानल्यामुळे अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ऑनलाईन फसवणूक न्यूज
ऑनलाईन फसवणूक न्यूज

By

Published : Oct 4, 2020, 5:53 PM IST

लंडन - यूके आणि भारतीय सुरक्षा दलांनी संगणक सॉफ्टवेअर सेवा फसवणुकीच्या गुन्ह्यांविरोधात नुकतीच संयुक्त कारवाई केली. यामध्ये भारतातील सहा शहरांमधील 10 संशयित कार्यालयांवर छापे टाकण्यात आल्याची माहिती ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी दिली.

यूकेमधील लोकांची या कंपन्यांनी फसवणूक केल्याचे दि सिटी ऑफ लंडन पोलीस या संस्थेने म्हटले आहे. ही संस्था यूकेमध्ये फसवणुकीविरोधात राष्ट्रीय पातळीवर काम करते. फसवणुकीची माहिती या संस्थेने त्यांच्या भारतातील समकक्ष असलेल्या सीबीआयला दिली आहे.

'सीबीआयच्या या कारवाईचे आम्ही स्वागत करतो आणि गुन्हेगारांना भारतीय न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांना पाठिंबा देऊ,' असे लंडन शहरातील हंगामी पोलीस मुख्य अधीक्षक अ‍ॅलेक्स रोथवेल यांनी सांगितले.

भारतातील लॉकडाऊनवेळी आम्हाला यूकेमधील संगणक सॉफ्टवेअर सेवेच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी घट झाल्याचे आढळले होते. मात्र, लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार त्वरित परिस्थितीशी जुळवून घेतात, आम्हाला हे माहीत आहे, असे ते म्हणाले. अधिकाधिक लोक घरातून काम असल्यामुळे अशा प्रकारची फसवणूक रोखण्याची गरज अधिक तीव्र बनली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा -राजस्थान : डुंगरपूर हिंसाचाराप्रकरणी १०० जणांना अटक, सातशेपेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हा दाखल

काही लोक अशा सॉफ्टवेअर घोटाळ्यांना बळी पडले आहेत, त्यांच्या संगणकावर पॉप-अप संदेश आले होते. या संदेशांद्वारे या लोकांच्या संगणक किंवा डिव्हाइससंदर्भात गंभीर तांत्रिक अडचणी असल्याचे दर्शवले गेले. या समस्या सोडवण्यासाठी त्यांना हेल्पलाइनवर कॉल करण्याचा सल्ला देण्यात आला. यासाठी शुल्क आकारण्यात आले. या प्रकारातील पीडित लोकांनी हे शुल्क ऑनलाइन किंवा फोनद्वारे भरले. यामुळे त्यांचे आर्थिक तपशील गुन्हेगारांसह सामायिक केले गेले.

१७ सप्टेंबरला यासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सहा भारतीय शहरांमध्ये १० ठिकाणी छापे टाकले. विविध कंपन्यांशी संबंधित काही लोकांच्या घरांच्या पत्त्यांवरही भेट दिली. सिटी सिटी ऑफ लंडन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणांची सीबीआय चौकशी अद्याप सुरू आहे. भारत आणि यूकेच्या तपास संस्थांनी एकत्रित केलेल्या तपासात ३७ कॉल सेंटरवर कारवाई करण्यात आली तर, ८८ जणांना अटक केली गेली.

संगणकाशी संबंधित समस्या असल्याचे सूचित करणाऱ्या पॉप-अप संदेशांवर नमूद केलेल्या फोन नंबर्स किंवा वेबसाइटला भेट देऊ नये, असा इशारा पोलीस दल, दूरध्वनी सेवा प्रदाते आणि इंटरनेट सेवा प्रदात्यांकडून लोकांना वारंवार दिला जात आहे. या सूचना न मानल्यामुळे अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा -हुंडा दिला नाही म्हणून नवविवाहितेला तलाक; पतीला अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details