महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पीएनबी घोटाळा प्रकरण : नीरव मोदीची जामीन याचिका सातव्यांदा फेटाळली - नीरव मोदी बातमी

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे.नीरव मोदीवर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकमध्ये २ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

नीरव मोदी
नीरव मोदी

By

Published : Oct 26, 2020, 7:49 PM IST

लंडन - फरार हिरेव्यापारी नीरव मोदीचा पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. जामिनासाठी अर्ज करण्याची मोदीची ही सातवी वेळ होती. युके न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे. सलग सातवेळा नीरव मोदीने जामिनासाठी अर्ज केला होता.

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणात नीरव मोदी मुख्य आरोपी आहे.नीरव मोदीवर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकमध्ये २ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

नीरव मोदीला २० मार्च २०१९ला लंडनमध्ये अटक करण्यात आली होते. डिसेंबरमध्ये त्याला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून तो लंडनच्या वॉन्डस्वर्थ तुरुंगात आहे. त्याच्यावर वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात प्रत्यार्पणाचा खटला सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details