लंडन -लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जागा घेतील. ब्रेक्झिटनंतर थेरेसा मे यांनी 7 जूनला पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, जॉन्सन हे पंतप्रधानपदी विराजमान होतील, अशा शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती.
बोरिस जॉन्सन ब्रिटनचे नवे पंतप्रधान
ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो.
ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी आणि सत्तारूढ कंझर्वेटीव्ह पार्टीच्या नेतेपदासाठी सोमवारी निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये पक्षाच्या 1 लाख 60 हजार कार्यकर्त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. मतदान प्रक्रियेदरम्यान, जॉन्सन हे आघाडीवर होते. ब्रिटनच्या संविधानानुसार बहुमत असलेल्या पक्षाचा नेताच पंतप्रधानपदी विराजमान होतो. दरम्यान, थेरेसा मे सरकारमधील परराष्ट्र मंत्री अॅलन डंकन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच जॉन्सन यांच्यासोबत आपण काम करू शकणार नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
यापूर्वी रविवारी अर्थमंत्री फिलिप हॅमंड यांनीही जॉन्सन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यास आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा दिला होता. तर डेव्हिड गुईके यांनीही जॉन्सन यांच्या निवडीनंतर अनेक मंत्री राजीनामा देतील, असे म्हटले होते. नव्या पंतप्रधान पदाच्या निवडीपर्यंत थेरेसा मे या पंतप्रधानपदी कार्यरत राहणार आहेत. दरम्यान, मंगळवारी त्या अखेरची मंत्रिमंडळाची बैठक घेतील. त्यानंतर राणी एलिझाबेथ यांच्याकडे त्या आपला राजीनामा सोपवतील. त्यानंतर पुढील पंतप्रधानाच्या नावाची घोषणा केली जाईल. बोरिस जॉन्सन हे बुधवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभारही सांभाळला आहे.