मेलबोर्न- ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न शहरातील नाईटक्लबजवळ तीन अज्ञातांनी गोळीबार केला. या घटनेत काहीजण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना रविवारी सकाळी घडली आहे. हा दहशतवादी हल्ला नसावा असा अंदाज पोलीस विभागाच्या प्रवक्त्याने व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलियातील नाईटक्लबजवळ तीन अज्ञातांचा गोळीबार, दोघांची प्रकृती चिंताजनक
ऑस्ट्रिलियात बंदुकीच्या वापराबाबत कठोर कायदा असतानाही ही घटना घडली आहे.
प्रतिकात्मक
पोलिसांनी सांगितले की, चार जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. हल्लेखोर हे तिघेजण होते. त्यापैकी एकाचे वय हे २९ वर्ष तर दुसऱ्याचे ५० वर्ष होते. तिसऱ्याचे वय अजून निश्चित समजू शकले नाही.
हा हल्ला मोटारसायकल गँगशी निगडीत लोकांनी केला असावा, या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. यापूर्वी मेलबोर्नमध्ये असाच हल्ला झाला होता. त्या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला होता. ऑस्ट्रिलियात बंदुकीच्या वापराबाबत कठोर कायदा असतानाही ही घटना घडली आहे.