मॉस्को - रशियामध्ये शुक्रवारी कोविड - 19 चे 27 हजार 403 नवीन रुग्ण समोर आले. आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. संसर्गाच्या एकूण प्रकरणांमध्ये रशिया सध्या जगात स्तरावर चौथ्या क्रमांकावर आहे.
सिन्हुआच्या वृत्तानुसार, कोविड - 19 प्रतिसाद केंद्राने म्हटले आहे की, नवीन रुग्णांसह देशात संसर्ग होण्याचे प्रमाण वाढून 24 लाख 2 हजार 949 पर्यंत वाढले आहे. तर, मृतांचा आकडा 42 हजार 176 वर पोहोचला आहे. 18 लाख 88 हजार 752 लोक बरे झाले आहेत.
हेही वाचा -कोविड-19 विषयी युएनजीएचे विशेष सत्र, 100 हून अधिक नेते करणार संबोधित