महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

COVID-19 : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सरकारला मदतीची हाक - युक्रेन भारतीय विद्यार्थी

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी असलेल्या तमन्ना हिच्या पालकांशी ईटीव्ही भारतने चर्चा केली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सरकारकडे मदतीची विनंती केली होती, मात्र प्रशासनाकडून अजून त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.

Students stranded in Ukraine seeks government help
COVID-19 : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सरकारला मदतीची हाक..

By

Published : Apr 7, 2020, 6:20 PM IST

कीव - जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जगभरात अडकलेल्या बहुतांश भारतीयांना परत आणले आहे. तसेच आणखीही काही भारतीयांना परत आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.

यातच युक्रेनमध्ये अडकलेल्या काही भारतीय विद्यार्थ्यांचाही एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये युक्रेनमधील काही विद्यार्थी सरकारला आपली मदत करण्याची विनंती करत आहेत. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेले सुमारे ६०० विद्यार्थी अडकलेले आहेत. यामध्ये बहुतांश विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील आहेत.

COVID-19 : युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सरकारला मदतीची हाक..

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थिनी असलेल्या तमन्ना हिच्या पालकांशी ईटीव्ही भारतने चर्चा केली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सरकारकडे मदतीची विनंती केली होती, मात्र प्रशासनाकडून अजून त्यांना कोणतेही उत्तर मिळाले नाही.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनमध्ये कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या होस्टेलची मेसही बंद झाली आहे. त्यामुळे त्यांना अन्न मिळवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा वेळी भारतीय दूतावासाने तातडीने त्यांना मदत करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :जपानमध्ये आणीबाणीची घोषणा; राजधानी टोकियोसह 6 भागातील कारभार गव्हर्नरकडे

ABOUT THE AUTHOR

...view details