मद्रिद -स्पेनमधील कोरोनाच्या रुग्णांनी एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशातील रुग्णालये याला लढा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. देशाच्या बाडालोना शहरातील एका रुग्णालयाने, आपल्या वाचनालयाचेच आयसीयूमध्ये रुपांतर केले आहे.
या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी आवश्यक त्या सुरक्षेच्या साधनांशिवायच काम करत आहेत. आवश्यक ती साधने नसल्यामुळे त्याऐवजी रेनकोटसारखे प्लास्टिकचे कोट घालून हे डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत. यासोबतच रुग्णालयातील वाचनालय, आणि हृदयविकारासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कक्षालाही कोरोनाच्या रुग्णांसाठी समर्पित करण्यात आले आहे.