महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्रिटनमध्ये कोरोनाचे 16 हजार 22 नवे रुग्ण - Britain Corona lockdown news

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूबाधित 16 हजार 22 नवीन रुग्णांसह देशातील एकूण रुग्णांची संख्या 15 लाख 89 हजार 301 पर्यंत वाढली आहे. तर, मृतांच्या संख्येत 521 मृत्यूंसह भर पडून एकूण मृत्यूंची संख्या 57 हजार 551 वर पोचली आहे.

ब्रिटन कोरोना लॉकडाऊन न्यूज
ब्रिटन कोरोना लॉकडाऊन न्यूज

By

Published : Nov 29, 2020, 7:42 PM IST

लंडन - ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूबाधित 16 हजार 22 नवीन रुग्णांसह देशातील एकूण रुग्णांची संख्या 15 लाख 89 हजार 301 पर्यंत वाढली आहे. तर, मृतांच्या संख्येत 521 मृत्यूंसह भर पडून एकूण मृत्यूंची संख्या 57 हजार 551 वर पोचली आहे.

सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, ब्रिटीश सरकारच्या आपात्कालीन परिस्थितीतील वैज्ञानिक सल्लागार गटातर्फे (एसएजीई) इशारा देण्यात आला आहे की, ख्रिसमसच्या दिवशी कोरोना विषाणू प्रसाराच्या परिस्थितीत लागू केलेले निर्बंध शिथिल केल्यामुळे संसर्ग प्रकरणांमध्ये मोठी वाढ होऊ शकते.

हेही वाचा -लंडन : लॉकडाऊनविरोधात आंदोलन करणाऱ्या 150 हून अधिक लोकांना अटक

'जे लोक एका महिन्यात फारसे कोणाशी संपर्कात आलेले नाहीत, तेही थोड्या काळासाठी एकमेकांसोबत मिसळत आहेत. त्यांच्या माध्यमातून व्यापक प्रसार होण्याचा मोठा धोका आहे,' असे एसएजीईने शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एका निवेदनात म्हटले आहे. सणाच्या निमित्ताने लोकांच्या एकमेकांना भेटण्यामुळे काही दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होऊ शकते, असेही त्यात म्हटले आहे.

या आठवड्याच्या सुरूवातीस, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 2 डिसेंबर रोजी लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर इंग्लंडमध्ये कोरोनो विषाणू निर्बंधांची एक 'कठोर' तीन-स्तरीय प्रणाली जाहीर केली. इंग्लंडमध्ये सध्या एका महिन्यापासून राष्ट्रीय लॉकडाऊन सुरू आहे.

हेही वाचा -ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी

ABOUT THE AUTHOR

...view details