मॉस्को – रशियाने कोरोनावरील विकसित केलेल्या स्पूटनिक-5 बाबत धक्कादायक बाब घडली आहे. ही चाचणी महत्त्वाच्या तिसऱ्या टप्प्यावर असताना रशियन सरकारने लसीची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या श्वसनविकारावरील एका वरिष्ठ डॉक्टरने रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या नैतिक परिषदेवरून तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
सुरक्षिततेच्या मुद्द्यावरून स्पूटनिक-5 ची नोंदणी थांबवावी अशी प्राध्यापक अलेक्झांडर चुचॅलिन यांची इच्छा होती. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी जगातील पहिल्या कोरोनावरील लसीची नोंदणी करण्यात येणार असल्याचे मंगळवारी जाहीर केले. त्यानंतर रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्खो यांनी कोरोनावरील लसीचे दोन आठवड्यात उत्पादन करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. असे असले तरी जगभरात रशियाने विकसित केलेल्या कोरोना लसीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.