खार्किव आणि सुमी वगळता युक्रेनमधून 10,000 लोकांना बाहेर काढण्यात आले. सुमी येथून तुम्हाला बाहेर काढण्यात आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. पाश्चिमात्य सीमेवर जाणाऱ्या भारतीयांना आणखी काही तास थांबवे लागले, भारत सरकार तुम्हाला लवकरच घरी घेऊन जाईल, असे कीव येथील भारतीय दुतावासाने युक्रेनमध्ये अडकलेल्या आवाहन केले आहे.
Russia-Ukraine War LIVE Updates : 'भारत सरकार तुम्हाला लवकरच घरी घेऊन जाईल', युद्धाचे अपडेट वाचा एका क्लिकवर - nuclear plant bombed
19:51 March 05
'भारत सरकार तुम्हाला लवकरच घरी घेऊन जाईल' - कीव येथील भारतीय दुतावासाचे आवाहन
19:43 March 05
पंतप्रधान मोदी यांची युक्रेन मुद्द्यावर उच्चस्तरीय बैठक
पंतप्रधान मोदी यांची लवकरच युक्रेन मुद्द्यावर एक उच्चस्तरीय बैठक होणार आहे.
19:39 March 05
हंगेरीतील विद्यार्थ्यांना काही स्वयंसेवी संस्थांकडून अन्न पुरवठा
हंगेरी येथील बुडापेस्टमध्ये निवारागृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना काही स्वयंसेवी संस्था अन्न पुरवठा करत आहेत. हर्षित या स्वयंसेवकाने सांगितले की, "आम्ही अनेक ठिकाणाहून जेवण गोळा करत आहेत. लोक, रेस्टॉरंट्स हे दान करत आहेत. आम्ही अन्न गोळा करतो, पॅक करतो आणि नंतर विद्यार्थ्यांना वाटतो,"
19:37 March 05
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा इशारा
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे की, युक्रेनवर नो-फ्लाय झोन लादण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही देशाने मॉस्कोने सशस्त्र संघर्षात प्रवेश केला असल्याचे मानले जाईल,
16:31 March 05
'युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा' यावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष यांच्यात चर्चा
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी ब्रुसेल्समधील युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांची भेट घेतली. त्यांनी "युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेला पाठिंबा" यावर चर्चा केली.
12:06 March 05
रशियाकडून तात्पुरता युद्धविराम
रशियाकडून तात्पुरती युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. तात्पुरते हल्ले थांबवण्याचा हल्ला पुतीन यांनी घेतला आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याासाठी हा निर्णय पुतीन यांनी घेतला आहे.
10:58 March 05
कीवमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा. रहिवाशांना आश्रय घेण्याच्या सुचना.
10:18 March 05
रशियाने आतापर्यंत 500हून अधिक क्षेपणास्त्रे युक्रेनवर डागली
युद्ध सुरू झाल्याच्या दिवसापासून आतापर्यंत रशियाने 500हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. रशिया दररोज सुमारे दोन डझन सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे हल्ल्यासाठी वापरत आहे, अशी माहिती आहे. तसेच युद्धबळी आणि जखमींची संख्या अधिक असल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.
09:21 March 05
वोलोडिमीर झेलेन्स्की आज अमेरिकन सिनेटला संबोधित करणार
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आज अमेरिकन सिनेटला संबोधित करणार आहेत. शुक्रवारीयुक्रेनच्या हवाई क्षेत्राला निषिद्ध क्षेत्र (नो फ्लाय झोन) जाहीर करण्यास किंवा त्यावर देखरेख ठेवण्यास ‘नाटो’ने नकार दिला होता. नाटोच्या या निर्णयामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की चांगलेच संतापले आहेत. आज ते काय बोलतील याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. युक्रेनच्या अध्यक्षांनी नाटोला नो-फ्लाय झोनचे आवाहन केले होते. जे नाटोने स्वीकारण्यास नकार दिला. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी नाटोच्या या निर्णयाचे समर्थन केले. युक्रेनला नो फ्लाय झोन तसे केल्यास त्याची परिणती युरोपात अण्वस्त्रसज्ज रशियाशी युद्ध भडकण्यात होऊ शकते, असा इशारा ‘नाटो’चे सरचिटणीस जेन्स जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी शुक्रवारी दिला.
09:12 March 05
भारताचे रशिया-युक्रेनला शस्त्रसंधीचे आवाहन
भारताने रशिया-युक्रेनला शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे. शस्त्रसंधी लागू केल्याशिवाय 3000 नागरिकांना मायदेशी आणण्याच्या प्रयत्नात मोठे अडथळे असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. पूर्व युक्रेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या भागातून भारतीयांना सुखरूप आणणे ही आमची प्राथमिकता असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. युद्धविराम झाल्यास भारतीयांना तातडीने मायदेशी आणता येईल, असेही त्यांनी म्हटलं.
09:09 March 05
झेलेन्स्की यांनी देश सोडला नाही
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की देश सोडून गेल्याचा दावा रशियाकडून केला जात आहे. रशियन सरकारचे वृत्तमाध्यम 'स्पुतनिक'ने हा दावा केला आहे. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पोलंडमध्ये आश्रय घेतल्याचे या वृत्तात म्हटले. मात्र, हा दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. झेलेन्स्की यांनी देश सोडला नाही आणि राष्ट्रपती अजूनही युक्रेनमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले.
09:08 March 05
युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या घराजवळ हल्ला
रशियाने सुरू केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रशियाने डागलेला एक रॉकेट युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या निवास स्थानाजवळ पडला असल्याचे वृत्त आहे.
07:53 March 05
मागण्या मान्य झाल्यास चर्चा करण्यास तयार - रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन
युक्रेनवरील युद्धाच्या 9व्या दिवसापर्यंत कोणतेही मोठे यश मिळाले नसताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी एक मोठे विधान केले. पुतिन यांनी युक्रेनच्या शहरांवर बॉम्बस्फोट केल्याच्या आरोप नाकारले. आपल्या मागण्या मान्य झाल्यास चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
07:41 March 05
Russia-Ukraine War LIVE Updates : रशियाकडून तात्पुरती युद्धबंदी, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर
कीव - रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धाचे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बधांमुळे रशियाची कोंडी होईल, असा दावा करण्यात येत आहे.
अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याचा ताबा -
रशियाने युक्रेनच्या झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्यानंतर ताबा मिळवला आहे. यानंतर ब्रिटनने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. एनरहोदर हे नीपर नदीवर वसलेलं एक शहर आहे. एनरहोदरमध्ये युरोपातील सर्वात मोठं झॅपोरीझिया अणुऊर्जा प्रकल्प आहे. युक्रेनच्या एकूण वीज उत्पादनाच्या जवळपास 25 टक्के उत्पादन या प्रकल्पामध्ये होतं. जर रिॲक्टरला धक्का लागला असता तर चर्नोबिलपेक्षाही 10 पटीने विध्वंस झाला असता.
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी युक्रेन सोडले?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेन सोडले असून, ते सध्या पोलंडमध्ये पोहोचल्याचा दावा रशियन माध्यमांनी केला आहे. अलिकडेच झेलेन्स्की यांनी देश सोडल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र, नंतर त्यांनी स्वत: समोर येत हे वृत्त फेटाळले होते. आता त्यांनी युक्रेन सोडल्याचा पुन्हा एकदा दावा करण्यात आला आहे.
भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम -
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. आणखी एक विद्यार्थी कीवमध्ये गोळीबारात जखमी झाला, अशी माहिती केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी दिली. हा विद्यार्थी कीवमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला गोळी लागली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे ते म्हणाले. या विद्यार्थ्याचे नाव हरज्योतसिंग असे असून, तो मूळचा छत्तरपूरचा आहे.
रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर -
युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला खुद्द रशियामधील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेन विरोधातील युद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.