युक्रेनमध्ये दोन भारतीयांचा मृत्यू पूर्णपणे भिन्न परिस्थितीत झाला आहे. आम्ही युक्रेनच्या दूतावासाशी संपर्क साधला आहे आणि नवीनचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे MEA प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
Russia-Ukraine war LIVE Updates : युक्रेनच्या संसदेची रशियन नागरिकांच्या मालकीच्या मालमत्तेची जप्ती करण्यास परवानगी - Russia Ukraine war update
20:01 March 03
नवीनचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत - MEA प्रवक्ते अरिंदम बागची
19:48 March 03
युक्रेनच्या संसदेची रशियन नागरिकांच्या मालकीच्या मालमत्तेची जप्ती करण्यास परवानगी
कीव - युक्रेनच्या संसदेने युक्रेनमधील रशिया किंवा रशियाच्या नागरिकांच्या मालकीच्या मालमत्तेची जप्ती करण्यास परवानगी देण्यासाठी कायद्याला मान्यता दिली आहे याबाबतचे विधेयक पारित केले आहे.
15:48 March 03
अणुयुद्धाचा विचार रशियन लोकांच्या डोक्यात नाही - रशियन परराष्ट्र मंत्री
रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी पाश्चात्य राजकारण्यांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'अणुयुद्ध' विचारात घेतल्याचा आरोप केला जात आहे तो विचार रशियन लोकांच्या डोक्यात नाही.
13:31 March 03
युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सने रशियन चित्रपटांवर बंदी घातली.
13:05 March 03
जर्मनी युक्रेनला 2,700 हवाई विरोधी क्षेपणास्त्रे वितरीत करणार आहे.
13:05 March 03
रशियन आणि बेलारूस खेळाडूंना हिवाळी पॅरालिम्पिकमध्ये बंदी: आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती
11:53 March 03
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय विद्यार्थ्यांच्या गटाशी संवाद साधला.
11:08 March 03
ऑपरेशन गंगा अंतर्गत 3726 भारतीयांना आज बुखारेस्ट येथून 8 फ्लाइट, सुसेवा येथून 2 फ्लाइट, कोसीस येथून 1 फ्लाइट, बुडापेस्ट येथून 5 फ्लाइट आणि रझेझोव येथून 3 फ्लाइटने मायदेशी आणण्यात येत आहे.
10:16 March 03
युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आज दिल्ली विमानतळावर पोहोचले.
09:07 March 03
युक्रेनमधून सुटका केलेल्या भारतीयांना घेऊन भारतीय वायुसेनेचे चौथे विमान दिल्लीजवळील हिंडन एअरबेसवर दाखल झाले.
07:59 March 03
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विशेष विमान मुंबईत पोहोचले.
ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईला पोहोचणारे एअर इंडियाचे हे तिसरे विमान आहे.
या विमानाने 183 भारतीय नागरिकांना रोमानियाची राजधानी बुखारेस्ट येथून आणण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हेही विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत.
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले मुंबईला येणाऱ्या भारतीयांच्या तिसऱ्या तुकडीचे स्वागत.
07:54 March 03
रशियाने दक्षिणेकडील खेरसन शहर ताबा मिळवला आहे.
07:52 March 03
Russia-Ukraine war LIVE Updates : युक्रेनमधील खेरसन शहर रशियाच्या ताब्यात, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर
कीव -रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले असून आतापर्यंत रशियन सैन्याकडून झालेल्या हल्ल्यात भारताच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. युक्रेनशेजारील देशांमधून ऑपरेशन गंगा अंतर्गत विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यात येत आहे.
निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये गेले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया बुखारेस्ट, रोमानिया येथे पोहोचले आहेत. तर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू विशेष दूत म्हणून स्लोव्हाकियात पोहचले आहेत. याशिवाय, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी बुडापेस्ट, हंगेरी येथे पोहोचले. तर जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे पोलंडला पोहचले आहेत. हे चारही नेते भारताचे विशेष दुत म्हणून युक्रेनमधून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सरकारमध्ये समन्वय साधण्याचे काम करत आहेत.
कीवमधील भारतीय दूतावास बंद -
राजधानी कीवमधील मुख्य टेलिव्हिजन टॉवरवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात पाच जण ठार झाले आहेत. टेलिव्हिजन टॉवरवर झालेल्या हवाई हल्ल्यामुळे राज्यातील प्रसारण बंद झाले. राजधानी कीवमध्ये होत असलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.
रशियावर निर्बंध -
रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बधांमुळे रशियाची कोंडी होईल असा दावा करण्यात येत आहे. तसेच रशियन बँकांना स्विफ्टमधून देखील निष्कासीत करण्यात आले आहे. पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला युद्ध थांबवा अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा दिला आहे.
रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर -
युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला खुद्द रशियामधील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेन विरोधातीलयुद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.