राजधानी कीवमधील मुख्य टेलिव्हिजन टॉवरवर रशियाने केलेल्या हवाई हल्ल्यात पाच जण ठार झाले आहेत. टेलिव्हिजन टॉवरवर झालेल्या हवाई हल्ल्यामुळे राज्यातील प्रसारण बंद झाले. राजधानी कीवमध्ये होत असलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावास बंद करण्यात आला आहे.
Russia-Ukraine war LIVE Updates : युक्रेनची राजधानी कीवमधील भारतीय दूतावास बंद, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर - Russia Ukraine war update
14:07 March 02
युद्धामध्ये आतापर्यंत रशियाचे ६००० जण मारले गेले. युक्रेनच्या अध्यक्षांचा दावा.
13:25 March 02
बुखारेस्ट येथून 218 भारतीयांना घेऊन विशेष विमान नवी दिल्लीत दाखल झाले.
12:40 March 02
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन बुडापेस्ट येथून भारतीय विमानाने दिल्लीसाठी उड्डान घेतले.
09:47 March 02
तंबू, ब्लँकेट आणि इतर साहित्य घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान हिंडन एअरबेसवरून लवकरच उड्डाण घेणार आहे.
09:29 March 02
हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि स्लोव्हाक रिपब्लिकसह सीमा ओलांडून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 24x7 नियंत्रण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
09:08 March 02
कीवमधील भारतीय दूतावास बंद
08:57 March 02
युक्रेनमधून आणखी 1377 भारतीय नागरिकांना परत आणण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी टि्वट करून सांगितले.
07:53 March 02
चार्ल्स मिशेल यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद
युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. युक्रेनच्या खार्किव शहरात एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. युरोपीय देश युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी परोपरी मदत करत आहोत आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संरक्षणासाठी जगाने एकजूट केली पाहिजे, असे त्यांनी म्हटलं.
07:51 March 02
कॅनडाने रशियन जहाजे, बंदरे, पाण्यातून मासेमारी नौकांवर बंदी घातली
07:49 March 02
टेक दिग्गज अॅपल कंपनीने मंगळवारी रशियामधील सर्व उत्पादनांची विक्री थांबवण्याची घोषणा केली आहे.
07:48 March 02
यूएस एअरस्पेसमधून रशियन विमानांना बंदी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन स्टेट ऑफ द युनियन भाषणादरम्यान रशियन विमानांना यूएस एअरस्पेस वापरण्यावर बंदी घालण्याची घोषणा करतील, असे अमेरिकन मीडियाने सांगितले.
07:27 March 02
रशियाची राजधानी मास्कोत हजारो नागरिकांनी निदर्शने केली. युद्ध बंद करण्यासाठी ही निदर्शने सुरू होती. रशियन सरकराने या नागरिकांना अटक केली आहे.
07:26 March 02
अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन क्रमांक
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आणि इतरांच्या मदतीसाठी दोन हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री सोम प्रकाश यांनी सांगितले. येथे जारी केलेल्या अधिकृत प्रकाशनानुसार, युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी आणि इतरांचे कुटुंब हेल्पलाइन क्रमांक 9173572-00001 आणि 9198154-25173 वर कॉल करू शकतात.
06:58 March 02
Russia-Ukraine war LIVE Updates : युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट
कीव - रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. तर युक्रेनमध्ये उच्च शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी तेथे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून हालचाली करण्यात येत आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीय विद्यार्थ्यांचे कुटुंब चिंतेत असून पाल्याला मायदेशी आणण्यासाठी धडपड करत आहेत. परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. मंगळवारी रशियन सैन्याच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता वाढली आहे. मिळेल कोणत्याही मार्गाने भारतीयांनी कीव शहर सोडावे, असा सल्ला भारत सरकारकडून देण्यात आला आहे.
ऑपरेशन गंगा -
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी भारतीय हवाई दलाला (IAF) ऑपरेशन गंगाला सहकार्य करण्याने सांगितले आहे. हवाई दलाच्या क्षमतेचा उपयोग केल्यास लोकांना कमी वेळेत बाहेर काढता येईल, असे सूत्रांनी सांगितले. भारतीय हवाई दल ऑपरेशन गंगा अंतर्गत अनेक सी-17 विमाने तैनात करण्यात येत आहे. तब्बल 14,000 भारतीय नागरिक अजूनही युक्रेनमध्ये आहेत. IAF निर्वासित योजनेसह सज्ज असून, कीव, खार्किव आणि ओडेसा येथे हजारो भारतीयांची सुटका करणार आहे.
विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव -
युक्रेनमधून शेजारी देशांमध्ये जाताना भारतीयांसोबत दुजाभाव ( Indians being beaten in Ukraine ) होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थांना मारहाण होत असल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टि्वट केला होता.
युक्रेनच्या सीमेवर असलेल्या देशांसाठी भारताचे विशेष दूत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सोमवारी युक्रेन संकटावर उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. काही केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये जाऊन निर्वासन मोहिमेत भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सुचवले होते. त्यानुसार निर्वासन मोहिमेत समन्वय साधण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे भारताचे विशेष दूत म्हणून युक्रेनच्या शेजारील देशांकडे रवाना झाले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया बुखारेस्ट, रोमानिया येथे पोहोचले आहेत. तर केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजिजू विशेष दूत म्हणून स्लोव्हाकियात पोहचले आहेत. याशिवाय, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी बुडापेस्ट, हंगेरी येथे पोहोचले. तर जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे पोलंडला पोहचले आहेत. हे चारही नेते भारताचे विशेष दुत म्हणून युक्रेनमधून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी सरकारमध्ये समन्वय साधण्याचे काम करतील.