रशियाने शत्रुराष्ट्रांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, युरोपियन संघातील देश, यूके, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंड, व्हर्जन इसलँड, गिब्राल्टर, युक्रेन, माँटिनिग्रो, स्वित्झर्लंड, अल्बानिया, अँडोर्रा, आईसलँड, लिचेस्टाईन, मोनॅको, नॉर्वे, सॅन मॅरिनो, नॉर्थ मॅकेडोनिया, सिंगापूर, मायक्रोनिसिया, न्यूझिलँड, तैवानचा समावेश आहे.
Russia-Ukraine war LIVE Updates : अमेरिकेचे जवान नाटोला मदत करण्याकरिता पोलंडच्या दिशेने रवाना - nuclear plant bombed
22:54 March 07
रशियाकडून शत्रुराष्ट्राची यादी जाहीर
22:45 March 07
अमेरिकेचे जवान नाटोला मदत करण्याकरिता पोलंडच्या दिशेने रवाना
एअर कॅव्हलरी ब्रिगेडमधील अमेरिकेचे जवान हे एच-64 आणि युएच-60 ब्लॅक हॉकने ग्रीसवरून पोलंडच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे जवान नाटोचे सहकारी आणि मित्रदेशांना मदत करणार असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
22:39 March 07
युक्रेन सरकारने 1.46 लाख परकीय लोकांना युक्रेन सोडण्यासाठी मदत
युक्रेन सरकारने विदेशातील 1.46 लाख परकीय लोकांना युक्रेन सोडण्यासाठी मदत केली आहे. त्यामध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रशियाने तातडीने शस्त्रसंधीचे पालन करून सुमी, खारकिव, मारियुपोलमधून मार्ग खुला करावा, असे युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
19:11 March 07
पोलंड आणि भारत हे बंधू - पोलंडच्या भारतामधील राजदुताची प्रतिक्रिया
युद्धामुळे युक्रेनमधून पोलंडमध्ये 10 लाखांहून अधिक लोक आले आहेत. पोलंड हा नेहमीच मदतीसाठी तयार आहे. आम्ही मनापासून भारतीयांचे स्वागत करतो. पोलंड आणि भारत हे बंधू आहेत, असे पोलंडच्या भारतामधील राजदूत अॅडम बुराकोवासकी यांनी म्हटले आहे.
17:59 March 07
ऑपरेशन गंगांतर्गत 1314 विद्यार्थ्यांना सात विशेष विमानांनी भारतात आणण्यात येणार- केंद्र सरकार
ऑपरेशन गंगांतर्गत 1314 विद्यार्थ्यांना सात विशेष विमानांनी युक्रेन शेजारी असलेल्या देशांमधून फ्लाईटने आज आणण्यात येत आहे. युक्रेनमधून 17,400 भारतीयांना 22 फेब्रुवारीपासून आणण्यात आल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे.
ऑपरेशन गंगांतर्गत आज 4 विमाने दिल्लीत तर 2 मुंबईत पोहोचली आहे. आज सायंकाळी आणखी एक विमान युक्रेनवरून पोहोचले आहे. बुडापेस्टमधून 5 तर बुचारेस्ट आणि सुकेवामधून प्रत्येकी एका विमानाचे उड्डाण झाले आहे. मंगळवारी सुकेवामधून 2 स्पेशल नागरी विमानांची उड्डाणे होणार आहे. त्यामधून 400हून अधिक विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात येणार आहे.
दरम्यान, युक्रेयिन व रशियाचे परराष्ट्र मंत्री हे 10 मार्च रोजी तुर्कीमध्ये भेटणार आहे.
17:09 March 07
रशिया-युक्रेनच्या प्रतिनिधीमध्ये येत्या 2 तासांमध्ये चर्चा होण्याची शक्यता
युक्रेन-रशियामधील युद्धाबाबत महत्त्वाची बातमी आहे. रशियाचे प्रतिनिधी हे बेलारुसमधील ब्रेस्टमध्ये वाट पाहत आहेत. येत्या दोन तासांमध्ये रशिया-युक्रेनच्या प्रतिनिधीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.
16:16 March 07
रशियाकडून रात्रीच्यावेळी युक्रेनमधील काही शहरांवर रॉकेटने हल्ला- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
रशियाने रात्रीच्यावेळी मायकोलॅविवमधील रहिवाशी ठिकाणावर रॉकेटने हल्ला केला. खारकिव आणि शेजारील शहरातही रशियाने हल्ला केला. लष्करी दृष्टिकोनातून याला शून्य अर्थ होता. ही निव्वळ दहशत असल्याचे युक्रेनच्या राष्ट्राध्यांनी म्हटले आहे.
15:46 March 07
डॉक्टर गिरीकुमार पाटील याचा पाळीव प्राणी जग्वार आणि पँथरशिवाय युक्रेन सोडण्यास नकार
जग्वार कुमार या नावाने प्रसिद्ध असलेले भारतीय डॉक्टर गिरीकुमार पाटील यांनी आपल्या पाळीव प्राणी जग्वार आणि पँथरशिवाय युक्रेन सोडण्यास नकार दिला आहे. "मी दूतावासाला फोन केला पण मला योग्य प्रतिसाद मिळाला नाही. मी जिथे आहे तिथे रशियन लोकांनी वेढले आहे, पण मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे. मी त्यांना माझ्या मुलांप्रमाणे वागवतो," असे तो म्हणाला.
15:27 March 07
पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्यात 50 मिनिटे चर्चा; भारतीयांच्या सुटकेकरिता मदत करण्याचे दिले आश्वासन
युक्रेन-रशियामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली. ही चर्चा सुमारे 50 मिनिटे चालली. युक्रेनमधील बदलत्या स्थितीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन आणि रशियाची टीमध्ये सुरू असलेल्या तडजोडीबाबत माहिती दिल्याचे सरकारमधील सूत्राने सांगितले.
पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेनस्काय यांच्याशी थेट बोलणी करावी, अशी विनंती पंतप्रधान मोदींनी केली. युद्धबंदीची रशियाने केलेली घोषणा आणि सुमीसह इत ठिकाणावरून ह्युम कॉरिडर करत असल्याबद्दल मोदींनी रशियाचे कौतुक केले.
भारतीयांची सुमीसह इतर भागामधून सुरक्षित सुटका करण्याचे महत्त्वाचे असल्याचे पंतप्रधान मोदींनी पुतीन यांच्याबरोबरील चर्चेत सांगितले. विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटटका करण्यासाठी सर्व शक्य
15:13 March 07
पुतीन खोटे बोलतात आणि युक्रेनच्या लोकांचे मृत्यू होत आहेत - युक्रेन
युक्रेनचा रशियाने पहिल्यांदाच अनादर करण्याची वेळ नाही. आता, जगाला रशियाचा अनादर आणि तिरस्कार क्रुरतेचा अनुभव येत आहे. पुतीन खोटे बोलत आहेत आणि युक्रेनच्या लोकांचा मृत्यू होत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघातील युक्रेनचे कायमस्वरुपी सदस्य अॅन्टोन कोरिनव्हिच यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्हटले आहे. दुसरीकडे युक्रेनने ह्युमन कॉरिडॉरचा प्रस्ताव फेटाळल्याचा रशियाचा आरोप
14:43 March 07
युक्रेनमधील सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची लवकर सुटका करा- विद्यार्थिनीची मागणी
नवी दिल्ली- युक्रेनमधील सुमी शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांची भारत सरकराने लवकरात लवकर सुटका करावी, अशी मागणी प्रिया या विद्यार्थिनीने केली आहे. ती नुकतीच युक्रेनवरून भारतात परतली आहे. तिने सांगितले, की आम्ही खारकिवमध्ये अन्नासाठी संघर्ष करत होतो. 24 फेब्रुवारी ते 2 मार्चमध्ये आम्ही बँकरमध्ये राहिलो आहोत. रेल्वेत जागा मिळणे कठीण होते. कारण, ते भारतीयांना प्राधान्य देत नव्हते.
12:58 March 07
पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा
पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा केली. फोन कॉल सुमारे 35 मिनिटे चालला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली. पंतप्रधानांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या थेट संवादाचे कौतुक केले. तसेच युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार मानले. सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी पंतप्रधानांनी युक्रेन सरकारकडून पाठिंबा मागितला.
11:59 March 07
टिकटॉक, नेटफ्लिक्स आणि अमेरिकन एक्सप्रेसने रशियातील सेवा निलंबित केल्या.
टिकटॉकने रशियामध्ये लाइव्ह स्ट्रीमिंग थांबवले आहे आणि नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यावरही बंदी घातली आहे. तसेच, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने रशियामधील सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. तर अमेरिकन एक्सप्रेसने रशिया आणि बेलारूसमधील सर्व सेवा निलंबित केल्या आहेत.
11:05 March 07
रशियाकडून युद्धविराम घोषित, युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याचा निर्णय
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विनंतीवरून मानवतावादी कॉरिडॉर उघडण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये 0700 GMT पासून युद्धविराम घोषित केला. 07:00 GMT म्हणजेच भारतीय वेळेनुसार सकाळी 12 वाजता रशियाने युक्रेनमध्ये युद्धविराम (russia-ukraine crisis) घोषित केला.
10:46 March 07
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर बोलणार आहेत.
09:11 March 07
हरज्योत सिंगला पोलंडमार्गे भारतात आणण्यात येत आहे.
कीवमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना गोळी लागेलला भारतीय विद्यार्थी हरज्योत सिंगला पोलंडमार्गे भारतात आणण्यात येत आहे. तो मूळचा छत्तरपूरचा आहे.
09:07 March 07
पंतप्रधान मोदींची युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi to speak to Ukrainian President ) हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukrainian President Zelenskyy ) यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पीएम मोदींची युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी होणारी ही दुसरी चर्चा असेल. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून, भारतासह जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी हा प्रश्न चर्चेतून सोडवण्याचा सल्ला दोन्ही देशांच्या नेत्यांना दिला आहे.
09:05 March 07
Russia-Ukraine war LIVE Updates : अमेरिकेचे जवान नाटोला मदत करण्याकरिता पोलंडच्या दिशेने रवाना
कीव - रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. तर एक विद्यार्थी कीवमध्ये गोळीबारात जखमी झाला. युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला खुद्द रशियामधील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेन विरोधातील युद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.
हेही वाचा -Uttar Pradesh Phase 7 Updates : युपीत विधानसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा, 54 जागांसाठी मतदान सुरू