रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अण्वस्त्र सेनेला देखील सज्ज राहाण्याचे निर्देश दिल्यानंतर अणुयुद्धाचा देखील धोका निर्माण झाला आहे. युक्रेनमधील अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या अणुऊर्जा केंद्रावर आग लागली असून त्यामुळे आता इथे स्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ जारी करत जगाला इशारा दिला आहे. जर या अणुउर्जा केंद्रावर स्फोट झाला, तर तो सर्वांचा शेवट असेल. तो युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा करावा लागेल, असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
Russia-Ukraine war LIVE Updates : अणू उर्जा प्रकल्प गोळीबारामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी, होऊ शकतो चर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा विध्वंस, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर - War in Ukraine
14:17 March 04
तर तो युरोपचा शेवट असेल - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
13:11 March 04
रशियन सैन्याने युक्रेन अणुऊर्जा केंद्राच्या हद्दीत प्रवेश केला.
11:46 March 04
पंतप्रधान नरेंद्र मोदींंनी युक्रेनशी संबंधित परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.
11:46 March 04
रशियाची भारताला मदत
युक्रेनच्या खार्किव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थी आणि इतर परदेशी लोकांना रशियाच्या बेल्गोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन बसेस तयार आहेत. रशियन राष्ट्रीय संरक्षण नियंत्रण केंद्राचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिझिनत्सेव्ह यांनी गुरुवारी जाहीर केले.
10:48 March 04
ओडिशातील वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी रशिया-युक्रेन संघर्षावर पुरी बीचवर वाळू कला तयार करत युद्ध थांबवण्याचे आवाहन केले.
09:56 March 04
भारतीय हवाई दलाच्या विमानाने हिंडन एअरबेसवरून सकाळी 4:05 वाजता युक्रेनसाठी सुमारे 6 टन मदत साहित्य घेत उड्डाण केले.
09:55 March 04
कीवमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
07:48 March 04
उत्तर युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर भीषण हल्ला, 22 नागरिक ठार
उत्तर युक्रेनच्या चेर्निहाइव्ह शहरावर रशियन सैन्याने हल्ला केला. या हल्ल्यात किमान 22 नागरिक ठार झाल्याची माहिती आहे.
07:33 March 04
विद्यार्थ्यांना घेत दोन विमाने भारतात दाखल
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन भारतीय हवाई दलाची दोन C-17 विमाने बुखारेस्ट (रोमानिया) आणि बुडापेस्ट (हंगेरी) येथून दिल्लीजवळील हिंडन विमानतळावर दाखल झाले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले
07:26 March 04
रशियन सैन्य युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैन्याचा हल्ला
रशियन सैन्य युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प झापोरिझ्झिया एनपीपीवर सर्व बाजूंनी गोळीबार करत आहे. आग आधीच भडकली आहे. जर तो स्फोट झाला तर तो चेरनोबिलपेक्षा 10 पट मोठा असेल, असे युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमिट्रो कुलेबा यांनी म्हटलं.
07:10 March 04
Russia-Ukraine war LIVE Updates : अणू उर्जा प्रकल्प गोळीबारामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी, होऊ शकतो चर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा विध्वंस, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर
कीव -रशियाने युक्रेन विरोधात पुकारलेल्या युद्धामुळे ( Ukraine Russia Conflict ) जगभरात पडसाद उमटले आहेत. संपूर्ण जगात भीतीचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे परिस्थिती फार बिकट झाली आहे.रशियाने युक्रेनवर केलेल्या या हल्ल्याचा आता जगभरातून निषेध करण्यात येत असून, युद्ध थांबावावे अशी मागणी होत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीर युरोपीयन संघातील देशांनी एकत्र येत रशियावर कडक आर्थिक निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्बधांमुळे रशियाची कोंडी होईल असा दावा करण्यात येत आहे. तसेच रशियन बँकांना स्विफ्टमधून देखील निष्कासीत करण्यात आले आहे. पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाला युद्ध थांबवा अन्यथा परिणाम गंभीर होतील असा इशारा दिला आहे.
रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर -
युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला खुद्द रशियामधील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेन विरोधातीलयुद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.
भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार
भारतीय विद्यार्थ्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्याचे मंत्री व्ही. के सिंग यांनी सांगितले आहे. कीवमधून परत येताना त्याच्यावर गोळीबार झाल्याची माहितीआहे. कमीत कमी नुकसान आणि जास्तीत जास्त विद्यार्थी परत आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.