महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

एक जुलैला ठरणार पुतीन यांच्या '२०३६' योजनेचे भवितव्य! - व्लादिमीर पुतीन '२०३६' योजना

पुतीन हे २०३६ पर्यंत देशाचे अध्यक्ष राहतील (त्यांच्या इच्छेनुसार) अशी तरतूद त्यांनी देशाच्या राज्यघटनेमध्ये केली होती. ही तरतूद लागू करण्यासंबंधी एक जुलैला देशव्यापी निवडणूक घेण्यात येणार आहे.

Russia to decide Putin's 2036 plan's fate on July 1
एक जुलैला ठरणार पुतीन यांच्या '२०३६' योजनेचे भवितव्य!

By

Published : Jun 1, 2020, 10:31 PM IST

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या '२०३६' योजनेचे भवितव्य एक जुलैला ठरणार आहे. पुतीन हे २०३६ पर्यंत देशाचे अध्यक्ष राहतील (त्यांच्या इच्छेनुसार) अशी तरतूद त्यांनी देशाच्या राज्यघटनेमध्ये केली होती. ही तरतूद लागू करण्यासंबंधी एक जुलैला देशव्यापी निवडणूक घेण्यात येणार आहे.

एक जुलैला ठरणार पुतीन यांच्या '२०३६' योजनेचे भवितव्य!

यापूर्वी एप्रिलमध्ये हे मतदान घेण्यात येणार होते. मात्र, कोरोना महामारीमुळे हे मतदान पुढे ढकलण्यात आले होते. सध्या देशातील कोरोनाच्या प्रसाराचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे जुलैमध्ये याबाबत मतदान घेतले जाऊ शकते, असे पुतीन यांनी सांगितले. याबाबत अधिकाऱ्यांसोबत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

दरम्यान, मतदानादरम्यान गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, एक जुलैच्या सहा दिवस आधीपासूनच लोकांना याबाबत मतदान करता येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सहा दिवसांच्या कालावधीमध्ये हे मतदान पार पडणार असल्यामुळे गर्दी आणि पर्यायाने कोरोनाचा प्रसारही टाळता येणार आहे.

हेही वाचा :जागतिक आरोग्य संघटनेशी अमेरिकेने तोडले संबंध; काय होणार परिणाम...

ABOUT THE AUTHOR

...view details