मॉस्को -गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध ( Russia Ukraine War ) सुरू आहे. दिवसेंदिवस रशिया आधिक आक्रमक होत असल्याचे दिसून येत होते. रशियाने युक्रेनवर होत असलेल्या हल्ल्यात अनेक सामान्या निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर संपूर्ण जगभरातून रशियावर टीका होत आहे. यातच रशियाने आज तात्पुरती युद्धबंदीची घोषणा ( Russia declares ceasefire in Ukraine ) केली. सामान्य नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी कॉरडॉर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
युक्रनेच्या दोन शहरात रशियाने युद्धबंदी लागू केली आहे. मारियोपोल आणि ओलवोव्हाखा या शहरात युद्धविराम दिला आहे. आज रशिया-युक्रेनमधील युद्धाचा दहावा दिवस आहे. रशियाच्या या निर्णयाचा मोठा फायदा भारतीय नागरिक आणि विद्यार्थ्यांना होईल. एकूणच हा युद्धविराम 5 तासांसाठी असल्याची माहिती आहे. युद्धविराम झाल्याने या काळात नागरिक सुरक्षित स्थळी जाऊ शकतात. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्हटलं आहे.
रशियाने युद्धविराम केल्याने याचा मोठा फायदा भारताला होणार आहे. कारण, यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी सुरक्षीतरित्या सीमेवर पोहचू शकतात. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला आपले प्राण गमावावे लागले आहेत. तर एक विद्यार्थ्याला गोळी लागली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रशियाने काहीकाळासाठी युद्ध थांबवल्याने अनेंकाना स्थलातंर करण्यासाठी वेळ मिळेल.
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यापासून अनेक युक्रेनचे नागरिक देश सोडून गेले आहेत. तर काहींनी आपल्या कुटुंबाला देशाबाहेर ठेवले असून रशियाविरोधात मैदानात उतरले आहेत. युद्ध थांबवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसमोर ठेवल्या तीन अटी ठेवल्याची माहिती आहे.