महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

रशियाकडून आपली कोविड - 19 लस पूर्ण सुरक्षित असल्याचा दावा - रशियन संरक्षण मंत्रालय न्यूज

रशियन संरक्षण मंत्रालयाने जमेलिया सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजी अ‌ॅण्ड मायक्रोबायोलॉजीसोबत भागीदारीमध्ये कोविड-19 ची लस विकसित केल्याचे सांगितले आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचाही दावा केला आहे. या वैद्यकीय चाचणीमध्ये स्वतःहून सहभागी झालेल्या सर्वांवर या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

रशियन कोविड-19 लस
रशियन कोविड-19 लस

By

Published : Aug 5, 2020, 8:29 PM IST

मॉस्को - रशियन संरक्षण मंत्रालयाने जमेलिया सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इपिडेमिओलॉजी अ‌ॅण्ड मायक्रोबायोलॉजीसोबत भागीदारीमध्ये कोविड-19 ची लस विकसित केल्याचे सांगितले आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचाही दावा केला आहे.

3 ऑगस्टला या लसीचे वैद्यकीय चाचणीमध्ये स्वतःहून सहभागी झालेल्यांवर शेवटचे वैद्यकीय परीक्षण पूर्ण झाले असल्याचे बर्डेन्को मेन मिलिटरी क्लीनिकल हॉस्पिटलने एका निवेदनात म्हटले आहे.

या वैद्यकीय चाचणीमध्ये स्वतःहून सहभागी झालेल्या सर्वांवर या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. त्यांची रोगप्रतिकारशक्‍ती वाढली आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, या सर्वांवर कोणतेही अनावश्यक परिणाम किंवा त्यांच्या कामावर विपरित परिणाम झालेला नाही, असे सांगितले आहे.

कोविड-19 ची लस विकसित करण्यात रशियाचा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर संशयास्पद वाटत असतानाच ही घोषणा झाली आहे.

'जागतिक आरोग्य संस्थेच्या मते, सध्या किमान 26 कोविड-19 लसींचे वैद्यकीय परीक्षण सुरू आहे. यामध्ये एक सुरुवातीच्या स्टेजसाठी असलेली एक लस जमेलिया इन्स्टिट्यूट मध्ये आहे,' असे सीएनबीसीने सोमवारी म्हटले होते.

मात्र, संयुक्त राष्ट्र आरोग्य संस्थेने याशिवाय कोणती दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध असलेली लस रशियात असल्याचे सांगितले नव्हते.

मागील महिन्यात अमेरिका कॅनडा आणि ब्रिटन रशियावरती कोविड-19 लसीचा डेटा हॅक करून चोरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये रशियात मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण मोहीम राबवली जाईल. याशिवाय स्टेट रिसर्च सेंटर ऑफ युरोलॉजी अँड बायोटेक्नोलॉजी व्हिक्टर यांनीही तयार केलेली दुसरी लस सध्या वैद्यकीय चाचण्यांमधून जात असल्याचे ते म्हणाले. तसेच, रशियन आरोग्य मंत्रालयाने आणखी दोन लसी विकसित करणाऱ्यांकडून त्यांना स्वतःहून चाचणीत सहभाग घेणाऱ्यांवर वैद्यकीय चाचण्यांची परवानगी मिळावी, अशी येत्या काही आठवड्यात विनंती येईल, असे म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details