जिनेव्हा - संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रचिता भंडारी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. २५ दहशतवादी संघटना पाकिस्तानात सक्रिय आहेत, ही गोष्ट पाकिस्तान नाकारू शकेल का?, असा सवाल संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत रचिता भंडारी यांनी केला.
पाकिस्तानात २५ दहशतवादी संघटना सक्रिय; भारताने सुनावले खडे बोल - UN Human Rights Council
संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रचिता भंडारी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत.

स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेचे 43 सत्र पार पडले. यावेळी मानवाधिकार कार्यकर्त्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या छळामध्ये त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी अल्पसंख्यांकांवर तालिबान, इसिस आणि इतर सुन्नी दहशतवादी संघटनांकडून होणार्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
यावेळी संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रचिता भंडारी यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. 25 दहशतवादी संघटनांचे पाकिस्तान घर आहे, पाक हे नाकरू शकतो का. भारत केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही नाही. तर मजबूत कार्यशील देश आहे. भारताला कोणत्याही अयशस्वी देशाकडून शिकण्याची गरज नाही, जो स्वतःच्या देशात लोकशाही स्थापित करू शकत नाही किंवा मानवाधिकार जपू शकला नाही, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्ताननं पहिल्यांदा भारताचा काश्मीरमधील बळकावलेला भाग सोडावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.