माद्रिद - जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचे बळी गेले असून मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. स्पेनमधील राजघराण्यातील राजकुमारी मारिया टेरेसाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. 26 मार्चला वयाच्या 86 वर्षी त्यांनी पॅरिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. मारिया यांचे भाऊ प्रिन्स सिक्सटो एनरिके डी बॉरबोन यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये ही माहिती दिली.
स्पेनमधील राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू - कोरोना अपडेट
स्पेनमधील राजघराण्यातील राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. 26 मार्चला वयाच्या 86 वर्षी त्यांनी पॅरिसमध्ये अखेरचा श्वास घेतला.
![स्पेनमधील राजकुमारी मारिया टेरेसा यांचा कोरोनामुळे मृत्यू स्पेनमधील राजकुमारी मारिया टेरेसा कोरोनामुळे मृत्यू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6582311-thumbnail-3x2-mariateresa.jpg)
28 जुलै 1933 ला मारिया यांचा जन्म झाला होता. राजकुमारी मारिया यांना 'रेड प्रिन्सेस' म्हणूनही ओळखले जात होते. त्यांनी अनेक सामजिक कार्यामध्येही भाग घेतला आहे. जगातील शाही घराण्यांमधील सदस्याचा पहिल्यांदा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनी कोरोनाची लागण झाली आहे.
युरोपियन देशांमध्ये इटलीनंतर कोरोना विषाणूचा सर्वात जास्त परिणाम स्पेनमध्ये झाला आहे. स्पेनमध्ये 5 हजार 982 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 54 हजार 968 लोकांवर उपचार सुरू असून त्यातील 4 हजार 165 लोकांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान जगभरात कोरोनामुळे 30 हजार 892 लोकांचा मृत्यू झाला आहे.