महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

शनिवारी प्रिन्स फिलिप यांची अंत्ययात्रा; शाही सदस्य गणवेशात दिसणार नाही - ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप

प्रिन्स फिलिप यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शनिवार, 17 एप्रिल रोजी प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित असलेले राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य गणवेशात नसून सामान्य कपड्यांमध्ये दिसतील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी हा निर्णय घेतला आहे.

Prince Philip
फिलिप

By

Published : Apr 15, 2021, 8:45 PM IST

Updated : Apr 15, 2021, 10:42 PM IST

लंडन - राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिन्स फिलिप यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. प्रिन्स फिलिप यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शनिवार, 17 एप्रिल रोजी प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्कारास उपस्थित असलेले राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य गणवेशात नसून सामान्य कपड्यांमध्ये दिसतील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी हा निर्णय घेतला आहे.

ब्रिटनच्या राजघराण्यातील सदस्य बर्‍याचदा ब्रिटीश सैन्य, नौदल आणि हवाई दलातल्या मानद भूमिकांच्या आधारे सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सैन्य गणवेश परिधान करतात. गेल्या वर्षी रॉयल पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रिन्स हॅरीला मानद सैनिकी पदवी गमवावी लागली होती. त्यामुळे हॅरी सामान्य वेशात तर राजघराण्यातील इतर सदस्य गणवेशात उपस्थित राहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले असते. ते टाळण्यासाठी अंत्यसंस्कारावेळी राजघराण्यातील सर्वच सदस्य सामान्य वेशात उपस्थित राहतील, असा निर्णय राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी घेतल्याची माहिती आहे. या निर्णयामुळे कोणी हॅरीसंदर्भात प्रश्न उपस्थित करणार नाही.

प्रोटोकॉलनुसार सैन्यात सेवा बजावणारे हॅरी रॉयल कार्यक्रमात पदकासह सूट घालू शकतात. हॅरीने अफगाणिस्तानात लष्करी कर्तव्य बजावले आहे. आजोबा प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी प्रिन्स हॅरी रविवारी रात्री लॉस एंजेलिसहून लंडनला आले आहेत. पत्नी मेघन गर्भवती म्हणून डॉक्टरांनी तिला प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे, असे बकिंघम पॅलेसकडून सांगण्यात आले आहे.

अंत्यसंस्कारात केवळ 30 लोक सहभागी -

रॉयल नेव्ही, रॉयल मरीन, रॉयल एअरफोर्स आणि ब्रिटीश आर्मीच्या सदस्यांनी अंत्यसंस्कार यात्रेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. प्रिन्स फिलिप यांचे अंत्यसंस्कार शनिवार 17 एप्रिल रोजी विंडसर कॅसल येथे होणार आहेत. कोरोनामुळे या कार्यक्रमात 30 जण सहभागी होऊ शकतात.

हेही वाचा -आंध्र प्रदेश: मुलीवर झालेल्या बलात्कारातून झाली एकाच कुटुंबातील ६ जणांची हत्या

Last Updated : Apr 15, 2021, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details