लंडन -ब्रिटीश राजघराण्यातील प्रिन्स चार्ल्स येत्या नोव्हेंबरमध्ये 13 आणि 14 तारखेला भारत दौऱ्यावर येणार आहेत. चार्ल्स यांचा वाढदिवससुद्धा 14 नोव्हेंबरला असल्यामुळे तो दिल्लीमध्ये साजरा करणार असल्याची माहिती आहे.
प्रिन्स चार्ल्स यांचा हा 10 वा भारत दौरा असून दोन वर्षामध्ये दुसरा दौरा आहे. हा दौरा हवामान बदल, सामाजिक सुरक्षा आणि बाजारक्षेत्रातील आर्थिक उपाय यावर केंद्रित असेल. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी कॅमिला नसणार आहेत.