पॅरीस -जी-७ परिषदेत सहभागी होण्यासाठी फ्रान्समध्ये दाखल झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रान्समधील भारतीयांना संबोधित केले. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे ही सभा झाली. यावेळी त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या पॅरीस येथील भाषणातील महत्वाचे मुद्दे -
- भारत आणि फ्रान्समधील मैत्री अतूट
मोदी म्हणाले की भारत आणि फ्रान्समधील मैत्री अतूट आहे, दोन्ही देशांनी आजपर्यंत एकमेकांना पाठिंबा दर्शविला आहे. फ्रान्सच्या फुटबॉल टीमच्या चाहत्यांची संख्या इथल्या तुलनेत भारतात जास्त आहे. जेव्हा फ्रान्सने फुटबॉलचा विश्वचषक जिंकला, तेव्हा भारतात देखील उत्सव होता.
- आम्ही आमचे ध्येय पूर्ण केले आहे
आमच्या सरकारची काही उद्दिष्टे होती, जी आम्ही पूर्ण केली आहेत. अशा प्रकारची अनेक उद्दिष्टे आम्ही यापुढेही पूर्ण करणार आहोत
- आमच्या सरकारने तिहेरी तलाक संपवला
आमच्या सरकारला फक्त 75 दिवस झाले आहेत. या काळात आम्ही तिहेरी तलाकवर कायदा करून या प्रथेचा अंत केला आणि महिलांना खऱ्या अर्थाने समानतेचा अधिकार दिला.
- INFRA म्हणजे IN इंडिया आणि FRA म्हणजे फ्रान्स
- जगात भारताचे वैज्ञानिक आणि फ्रान्सच्या तंत्रज्ञानाला विशेष महत्व
- भारतीय लोकांनी जगात कुठेही गेले तरी त्यांचे भारतीयत्व जपलं आहे
- गणेश उत्सव हा आता फ्रान्सच्या सांस्कृतीचा एक भाग.. गणेश उत्सवाच्या काळात पॅरिस हा मिनी भारत बनतो.
- REFORM...PERFORM...TRANSFORM हा आमच्या सरकारचा नारा