महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

पोर्तुगाल कोरोनामुळे पुन्हा एकदा 'आपात्कालीन स्थिती'त

पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी या आठवड्यात राष्ट्रपतींना आपात्कालीन स्थिती जाहीर करण्याची शिफारस केली होती. पोर्तुगालमधील नागरी संरक्षणाची उच्च पातळी म्हणजे 'आपात्कालीन स्थिती'. यंदा 19 मार्चपासून 2 मेदरम्यान 45 दिवसांसाठी ही स्थिती लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या हालचाली आणि खासगी क्षेत्राच्या आरोग्य सेवांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

By

Published : Nov 7, 2020, 7:42 PM IST

पोर्तुगाल लेटेस्ट कोरोना न्यूज
पोर्तुगाल लेटेस्ट कोरोना न्यूज

लिस्बन - कोविड-19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोर्तुगीज अध्यक्ष मासेर्लो रेबेलो डी सुसा यांनी 9 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर या कालावधीत 15 दिवसांसाठी पुन्हा एकदा आपात्कालीन स्थिती जाहीर केली आहे.

सिन्हुआ या वृत्तसंस्थेने शुक्रवारी राष्ट्रपतींनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाच्या हवाल्याने म्हटले आहे की, ' मी आता 8 महिन्यांपासून सुरू असलेल्या महामारीच्या दरम्यान 'स्टेट ऑफ इमर्जन्सी'च्या निर्णयावर दुसऱ्यांदा स्वाक्षरी केली आहे. आम्हाला हे माहीत आहे की, ही स्थिती आणखी काही दिवसांनी वाढू शकते.'

पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी या आठवड्यात राष्ट्रपतींना आपात्कालीन स्थिती जाहीर करण्याची शिफारस केली होती. पोर्तुगालमधील नागरी संरक्षणाची उच्च पातळी म्हणजे 'आपात्कालीन स्थिती'.

हेही वाचा -अमेरिकेत 8 लाख 50 हजारहून अधिक लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह

यंदा 19 मार्चपासून 2 मेदरम्यान 45 दिवसांसाठी ही स्थिती लागू करण्यात आली होती. यामुळे लोकांच्या हालचाली आणि खासगी क्षेत्राच्या आरोग्य सेवांच्या वापरावर बंदी घालण्यात आली होती.

सद्यस्थितीत आपत्कालीन घोषणापत्रात (डिक्री) असे नमूद केले आहे की, सार्वजनिक अधिकारी या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंध घालू शकतात. याचा अर्थ असा नाही की, केवळ घरातच राहावे. जो प्रवास व्यावसायिक क्रियाकलापांसाठी किंवा आरोग्यासाठी, वर्गांमध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि जर परवानगी असेल तर वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासाठी असेल, त्यासाठी परवानगी असणार आहे.

आतापर्यंत पोर्तुगालमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 1 लाख 67 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2 हजार 792 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा -अमेरिकेत कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या 1 फेब्रुवारीपर्यंत 4 लाखांवर पोहोचण्याचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details