नीरव मोदीला लंडनमध्ये अटक, लवकरच भारताला प्रत्यर्पण होण्याची शक्यता - arrested
नीरव मोठ्या घोटाळ्यात सहभागी आहे. त्याला सोडणे म्हणजे त्याला पळण्याची संधी देणे होय, असे सांगून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याची वर्ड्सवर्थच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढील सुनावणी २९ मार्चला आहे.
लंडन- पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्याचा सूत्रधार हिरे व्यापारी नीरव मोदी यास स्कॉटलँड यार्डने लंडन येथील होलबार्न मेट्रो स्टेशनवरून अटक झाली. त्याचा लंडन येथील वेस्टमिन्स्टर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असून त्याला ९ दिवसांची म्हणजे २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अटकेनंतर नीरव मोदीने न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. तसेच, कर भरल्याचे आणि प्रवासाचे कागदपत्रही सादर केले होते. त्याचे वकील जॉर्ज हेबुर्न स्कॉट यांनी आपल्या अशीलाकडे प्रवासाचे तीन वेगवेगळे परवाने आहेत, असे न्यायालयाला सांगितले. परंतु जिल्हा न्यायाधीश मॅरी मॅलान यांनी जामीन अर्ज नामंजूर केला. वेस्टमिन्स्टर कोर्टात बराचवेळ चाललेल्या सुनावनी नंतर न्यायालयाने नीरव मोदी यास पोलीस कोठडी सुनावली.
नीरव मोठय़ा घोटाळ्यात सहभागी आहे. त्याला सोडणे म्हणजे त्याला पळण्याची संधी देणे होय, असे सांगून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याची वर्ड्सवर्थच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढील सुनावणी २९ मार्चला आहे. याच न्यायालयाने नीरव मोदीविरुद्ध अटक वारंट काढला होता. भारतातून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयचे अधिकारी प्रत्यर्पणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन पुढील आठवडय़ात लंडन जातील.
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी त्यांच्या वाराणसी दौऱ्यात या मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या, नीरव मोदी यांना अटक करणे ही सरकारची कामगिरी आहे. परंतु त्याला पळू कोणी दिले हा खरा सवाल आहे.