क्वेव - विविध देशांतील पालकांचा एक गट युक्रेनमध्ये सरोगसी पद्धतीने जन्मलेल्या त्यांच्या बाळांना भेटला. सरोगेट मातांच्या पोटी जन्म घेतलेल्या बालकांचा एक समुह कोरोना लॉकडाऊनमुळे युक्रेनमध्ये अडकला आहे.
युक्रेनमध्ये सरोगसी पद्धतीने जन्मलेल्या बाळांना भेटले त्यांचे पालक
युक्रेनमध्ये सरोगेट मातृत्वाला एक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. विविध देशांतील पालकांचा एक गट युक्रेनमध्ये सरोगसी पद्धतीने जन्मलेल्या त्यांच्या बाळांना भेटला. सरोगेट मातांच्या पोटी जन्म घेतलेल्या बालकांचा एक समुह कोरोना लॉकडाऊनमुळे युक्रेनमध्ये अडकला आहे.
शंभरहून अधिक जोडप्यांनी युक्रेनियन लोकपाल ल्युडमिला डेनिसोवा यांच्याकडे देशात प्रवेश देण्याची परवानगी मागितली होती. यातील ३१ जोडपी आपल्या अपत्यांना घेण्यासाठी युक्रेनमध्ये दाखल झाली आहेत. मात्र, त्यांना नियमानुसार दोन आठवड्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतरच या पालकांना नवजात अपत्यांना भेटता येणार आहे, असे डेनिसोवा यांनी सांगितले.
युक्रेनमध्ये सरोगेट मातृत्वाला एक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. जगातील काही मोजक्या राष्ट्रांतील नागरिकांना युक्रेनमधील महिला सरोगसीची सेवा देतात. सध्या या देशात सरोगसीसाठी ५० रुग्णालये कार्यरत आहेत.