लंडन -ऑक्सफर्ड आणि एस्ट्राजेनेका कंपनीची कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सिन अंतिम टप्प्यातील चाचणीला ब्रिटनमध्ये पुन्हा सुरुवात केली आहे. एस्ट्राजेनेकाने सांगितले, की ब्रिटनच्या मेडिसिन्स हेल्थ रेग्युलेटरी अथॉरिटीने ही लस सुरक्षित असल्याचा दावा केल्यानंतर पुढच्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी देण्यात आली. ६ सप्टेंबरला एका स्वंयसेवकाची तब्येत बिघडल्यानंतर व्हॅक्सिनच्या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या.
ऑक्सफोर्ड विद्यापीठ व एस्ट्राजेनेकाने म्हटले आहे, की एमएचआरए द्वारे परीक्षणाला सुरक्षित असल्याचा दावा केल्यानंतर एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डने ब्रिटनमध्ये कोरोना व्हयरस लस AZ1222 ची चाचणी सुरू करण्यात आली. कंपनी जगभरातील आरोग्य संघटनांबरोबर काम सुरू ठेवेले व त्यांना सूचित करेल, की लसीच्या पुढल्या टप्प्यातील चाचण्या कधी सुरू करायच्या आहेत.