लंडन :ऑक्सफोर्ड विद्यापीठाने आपल्या शब्दकोशामध्ये काही नवीन बदल केले आहेत. यामध्ये महिला (वुमन) या शब्दाच्या व्याख्या, आणि त्याचे समानार्थी शब्दही बदलण्यात आले आहेत. कित्येक दिवसांपासून याबाबत शब्दकोशावर टीका केली जात होती. त्यानंतर गेल्या वर्षी महिला शब्दाच्या व्याख्येमध्ये बदल करण्याबाबतची मागणी करणारी एक ऑनलाईन याचिका व्हायरल झाली होती. ३० हजारांहून अधिक लोकांनी या याचिकेवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर आता विद्यापीठाने हे बदल केले आहेत.
काय केले बदल..
महिला शब्दाच्या व्याख्येमध्ये यापूर्वी "पुरुषाची पत्नी, किंवा पुरुषाची प्रेयसी" असा उल्लेख होता. यात बदल करुन, "एखाद्या व्यक्तीची पत्नी, एखाद्या व्यक्तीची प्रेयसी" असे करण्यात आले आहे. असेच बदल 'पुरुष' शब्दाच्या व्याख्येतही करण्यात आले आहेत. "महिलेचा पती, प्रियकर" याऐवजी आता "एखाद्या व्यक्तीचा पती, प्रियकर" असा उल्लेख यात करण्यात आला आहे. यापूर्वी असलेले उल्लेख हे लिंगभेद दर्शवणारे होते, त्यामुळे लिंगभेदाला आळा घालण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या दोन्ही शब्दांच्या व्याख्या 'जेंडर न्यूट्रल' झाल्या आहेत.
समलैंगिक व्यक्तींकडून स्वागत..