लंडन -मुळ पाकिस्तानचे परंतु सध्या हद्दपार होऊन लंडन येथे राहणारे, 'मुताहिदा कौमी मूव्हमेंट'चे (एमक्यूएम) संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी, अनुच्छेद 370 च्या तरतुदींमध्ये बदल करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला देशातील नागरिकांचा प्रचंड पाठिंबा आहे, असे म्हटले आहे.
अल्ताफ हुसेन यांनी 1990 साली इंग्लंडमध्ये आश्रय मागितला होता, यानंतर काही वर्षात त्यांना ब्रिटनचे नागरिकत्व देखील मिळाले आहे. लंडन येथे राहूनही पाकिस्तानच्या राजकिय पक्षांपैकी प्रमुख एक असलेल्या एमक्यूएम आणि पाकिस्तानचे मुख्य सत्ता केंद्र असलेल्या आर्थिक राजधानी कराचीवर त्यांची भक्कम पकड आहे.
शनिवारी लंडन येथून एमक्यूएमच्या कार्यालयातून केलेल्या एका थेट प्रक्षेपणात त्यांनी जम्मू काश्मीर आणि कलम 370 च्या भारत सरकारच्या निर्णयाबाबत काही महत्वाची विधाने केली आहेत;
भारत सरकारना कलम 370 चा निर्णय हा नागरिकांच्या मोठ्या पाठिंब्यावर आधारित
अनुच्छेद 370 च्या तरतुदींमध्ये बदल करून जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याचा भारत सरकारच्या निर्णयाला भारतातील नागरिकांचा प्रचंड पाठिंबा आहे. पाकिस्तानमध्ये जर तितकी हिंमत असेल तर त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा जो भाग आहे तो पाकिस्तानमध्ये सामील करून दाखवावा, असे म्हणत हुसेन यांनी पाकिस्तानलाच आव्हान दिले आहे.