लंडन - इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी नव्या कोरोना विषाणूबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. नवा विषाणू अंत्यत धोकादायक असू शकतो. तसेच त्यामुळे मृत्यूदर वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. नव्या कोरोना विषाणूमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचे त्यांनी मान्य केले.
वैज्ञानिकांच्या गटाची बोरिस जॉन्सन यांच्यासोबत बैठक -
वैज्ञानिकांच्या समितीने पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना आणि श्वसनयंत्रेसंबंधीच्या आजाराची माहिती दिली. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनी हे वक्तव्य केले. नव्या कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होते हे दिसून येत असतानाच नव्या विषाणूमुळे मृत्यूदरही जास्त असण्याची शक्यता आहे. मात्र, नवा आणि जुना कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी लस सक्षम आहे. सोबतच देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अधिकचा ताण पडल्याचे त्यांनी म्हटले आहे.
केन्ट शहरात आढळला पहिल्यांदा घातक कोरोना विषाणू -
देशाच्या दक्षिण-पूर्व भागातील केन्ट शहरात पहिल्यांदा कोरोनाचा नवा विषाणू पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर या विषाणूचा प्रसार संपूर्ण देशात झाला. या विषाणूमुळे नागरिकांमध्ये पुन्हा भितीचे वातावरण पसरेल होते. कोरोना लसीकरणसााठी देशात सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. भारतामध्येही नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे इंग्लड भारत विमानेसवा काही काळ बंद करण्यात आली होती. मात्र, पुन्हा ही सेवा सुरळीत करण्यात आली आहे. इंग्लडहून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करूनच त्यांना सोडण्यात येत आहे. अन्यथा लक्षणे आढळल्यास निगराणीखाली ठेवण्यात येत आहे.