महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ब्रिटनमध्ये थेरेसा मे यांच्यानंतर पंतप्रधान पदासाठी ८ दावेदार - brexit

थेरेसा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्या ३ दिवसीय राजकीय दौऱ्यानंतर त्या औपचारिकरीत्या त्या पंतप्रधान पदावरून पायउतार होतील. यानंतर १० जूनपासून पक्षाचा नेता निवडण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू होईल.

थेरेसा मे

By

Published : May 27, 2019, 3:49 PM IST

लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे येत्या ७ जूनला राजीनामा देणार आहेत. त्यांच्या या घोषणेनंतर त्यांचा उत्तराधिकारी बनण्यासाठी माजी परराष्ट्र मंत्री बोरिस जॉन्सन यांच्यासह तब्बल ८ उमेदवार मैदानात आहेत. थेरेसा या ब्रिटनच्या सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत जॉन्सन सर्वांत पुढे आहेत.


थेरेसा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. अमेरकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच्या ३ दिवसीय राजकीय दौऱयानंतर त्या औपचारिकरीत्या त्या पंतप्रधान पदावरून पायउतार होतील. यानंतर १० जूनपासून पक्षाचा नेता निवडण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू होईल. संभाव्य उमेदवारांनी पंतप्रधान बनण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.


ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री मायकेल गोव्ह हे सर्वांत नवे संसद सदस्य आहेत. त्यांनीही आता रविवारी जॉन्सन यांच्याविरोधात उमेदवारी जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. गोव्ह यांनी रविवारी स्वतःचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले.
अन्य दावेदारांमध्ये माजी ब्रेक्झिट मंत्री डॉमिनिक राब, हाउस ऑफ कॉमन्सच्या माजी नेत्या अँड्रीया लीडसम, ब्रिटिश परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, आंतरराष्ट्रीय विकास मंत्री रोरी स्टीव्हर्ट, आरोग्य मंत्री मॅट हॉनकॉक आणि माजी पेन्शन मंत्री ईस्थर मॅकवे यांचे समावेश आहे. थेरेसा यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने ब्रिटन यूरोपीय महासंघातून ३१ ऑक्टोबरपर्यंत बाहेर पडण्याची शक्यता वाढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details