महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

९ वर्षांच्या विलंबानंतर अखेर बर्लिनचे नवीन विमानतळ सुरू - बर्लिनचे नवीन विमानतळ

तांत्रिक व नियोजनविषयक समस्यांमुळे सहा वेळा या विमानतळाचा उद्धाटन कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. 2012 मध्ये सर्वात लज्जास्पद म्हणजे उड्डाणे सुरू होण्यापूर्वी फक्त चार आठवड्यांपूर्वी उद्धाटन कार्यक्रम रद्द केला होता.

बर्लिन
बर्लिन

By

Published : Oct 31, 2020, 4:21 PM IST

बर्लिन (जर्मनी)- बर्लिनचे नवीन विमानतळ अखेर शनिवारी छोटेखानी समारंभ घेऊन सुरू करण्यात आले. तब्बल नऊ वर्षे उशिराने सुरू झाले असले तरी त्याच्या मूळ बजेट इतकाच जवळपास खर्च आल्याचे सांगण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी प्रवाशांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

पूर्व जर्मन चान्सलरांच्या नावाने असलेले बर्लिन ब्रॅंडनबर्ग विमानतळ विली ब्रॅंड्टचे बांधकाम 2006 मध्ये सुरू झाले होते आणि ऑक्टोबर २०११ मध्ये ते सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, तांत्रिक व नियोजनविषयक समस्यांमुळे सहा वेळा या विमानतळाचा उद्धाटन कार्यक्रम पुढे ढकलावा लागला होता. 2012 मध्ये सर्वात लज्जास्पद म्हणजे उड्डाणे सुरू होण्यापूर्वी फक्त चार आठवड्यांपूर्वी उद्धाटन कार्यक्रम रद्द केला होता. यामुळे या प्रकल्पाला राष्ट्रीय विनोद म्हणून संबोधले जात होते. विमानतळ व्यवस्थापकांनी बर्‍याच समस्यांवर पकड मिळविण्यासाठी धडपड केली, ज्यात अग्निसुरक्षेच्या कारणास्तव मोठी डोकेदुखी निर्माण झाली होती.

विमानतळासाठी जवळजवळ ६ अब्ज युरो (७ अब्ज डॉलर्स) खर्च आला आहे. आता देशात सर्वत्र कोरोनाची परिस्थिती असताना, हवाई वाहतूक अडचणीत आली असताना विमानतळाचे उद्घाटन केले जात असल्याने टीका होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details