पॅरिस -फ्रान्समध्ये दररोज कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले नवे रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासांत त्यांची संख्या 58 हजार 46 ने वाढली आहे. गुरुवारी देशातील आरोग्य महासंचालक जेरोम सालोमन यांनी ही माहिती दिली. याखालोखाल 2 नोव्हेंबरला 52 हजार 518 रुग्णांची नोंद झाली होती.
वृत्तसंस्था सिन्हुआनुसार, सॉलोमन यांनी पत्रकारांना सांगितले की, फ्रान्समध्ये कोविड - 19 हा रोग सुरू झाल्यापासून 16 लाखाहूनही अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
एकूण 39 हजार 37 रुग्ण या रोगाच्या संसर्गामुळे बळी पडले आहेत. त्यापैकी गेल्या 24 तासांत 363 लोकांचा बळी गेला.
एका दिवसात रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या सुमारे तीन हजारने वाढली आहे. सॉलोमनच्या म्हणण्यानुसार 447 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.