महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'कोविड-१९'साठी माँटेफिओर अन् 'आईनस्टाईन'ने तयार केले नवे औषध..

या चाचणीचे मागील महिन्यात जाहीर करण्यात आलेले प्राथमिक निकाल शुक्रवारी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या निकालांमधून असे दिसून आले की, कोविड-१९चा संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्यात आले, ते रुग्ण सरासरी ११ दिवसांत बरे झाले. त्या तुलनेत, प्लॅसिबो गटातील रुग्णांना बरे होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो.

Montefiore and Einstein test a new drug combination to conquer COVID-19
'कोविड-१९'साठी माँटेफिओर अन् 'आईनस्टाईन'ने तयार केले नवे औषध..

By

Published : May 31, 2020, 7:49 PM IST

हैदराबाद : माँटेफिओर हेल्थ सिस्टम्स आणि अल्बर्ट आईनस्टाईन कॉलेज ऑफ मेडिसिन यांनी अनुकूल कोविड-१९ उपचार चाचणीतील (अ‌ॅडाप्टिव्ह कोविड-१९ ट्रीटमेंट ट्रायल – एसीटीटी) पुढील टप्प्याची सुरुवात केली आहे. कोविड-१९चा गंभीर स्वरुपाचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचाराचे पर्याय शोधण्यासाठी ही चाचणी करणे, हा त्यामागील उद्देश आहे.

चाचणीच्या नव्या पुनरावृत्तीस एसीटीटी-२ म्हणून ओळखले जाते. नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थचा भाग असलेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‌ॅलर्जी अॅण्ड इनफेक्शिअस डिसिझेस (एनआयएआयडी) या संस्थेने चाचणीसाठी प्रायोजकत्व दिले आहे. मार्च महिन्यात, माँटेफिओर हे एकाच वेळी अनेक केंद्रांवर चाचणी करणारे पहिले ठिकाण ठरले होते. येथे रेमडेसिव्हिर या रक्तवाहिन्यांमधून देण्यात येणाऱ्या बहुपयोगी विषाणूविरोधी औषधाचे मूल्यमापन करण्यात आले होते.

या चाचणीचे मागील महिन्यात जाहीर करण्यात आलेले प्राथमिक निकाल शुक्रवारी न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या निकालांमधून असे दिसून आले की, कोविड-१९चा संसर्ग झालेल्या ज्या रुग्णांना रेमडेसिव्हिर देण्यात आले, ते रुग्ण सरासरी ११ दिवसांत बरे झाले. त्या तुलनेत, प्लॅसिबो गटातील रुग्णांना बरे होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागतो. सांख्यिकीदृष्ट्या ही मोठी सुधारणा आहे. सुमारे १,०६३ लोकांनी क्लिनिकल चाचणीत सहभाग नोंदवला. यापैकी ९१ म्हणजे सुमारे १० टक्के लोक हे माँटेफिओर आणि आईनस्टाईन येथील होते.

रेमडेसिव्हिरचे आश्वासक निकाल हाती आल्यानंतर, आता या चाचणीअंतर्गत रेमडेसिव्हिर आणि डबल-ब्लाईंड अनियत चाचणीत बॅरीसिटीनिब किंवा प्लॅसिबोबरोबर मिश्रणाचा अभ्यास केला जात आहे.

संधिवातामुळे शरीरात निर्माण होणारी दाहकता कमी करण्यासाठी बॅरीसिटीनिबची जाहिरात केली जाते. संशोधकांना आता हे पहावयाचे आहे की, बॅरीसिटीनिब आणि रेमडेसिव्हीर एकत्र केल्यास अतिदाहक असा ‘सायटोकिन स्टॉर्म’ कमी किंवा प्रतिबंधित करता येईल की नाही. कोविड-१९ चा संसर्ग झालेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा कोरोना विषाणूच्या संसर्गास प्रतिसाद देते, तेव्हा त्यांची फुफ्फुसे आणि शरीरातील इतर अवयवांवर या सायटोकिन स्ट्रोकचा जीवघेणा परिणाम होऊ शकतो.

“आम्हाला चिंता याची आहे की, काही लोकांमधील रोगप्रतिकारक यंत्रणेचा कोरोना विषाणूला प्रतिसाद हा संसर्गापेक्षा अधिक जीवघेणा ठरू शकतो आणि अद्याप यावर कोणताही उपचार उपलब्ध नाही”, असे बॅरी झिंगमन म्हणाले. झिंगमन हे आईनस्टाईन येथे मेडिसिनचे प्राध्यापक आहेत आणि माँटेफिओर हेल्थ सिस्टमच्या मोसेस विभागात संसर्गजन्य रोगांचे क्लिनिकल डायरेक्टर आहेत.

“आमच्या चाचणीत बॅरीसिटीनिबचा समावेश केल्यास कोविड-१९ शी संबंधित दाहकता कमी होऊ शकते आणि बॅरीसिटीनिबला रेमडेसिव्हिरसोबत मिसळल्यास रोगाने सर्वाधिक गंभीर पद्धतीने ग्रासलेल्या लोकांसाठी अधिक प्रभावी उपचार तयार होऊ शकतो.”

डॉ. झिंगमन यांनी माँटेफिओर येथे झालेल्या मूळ रेमडीसिव्हीर अभ्यासाचे पर्यवेक्षण केले होते आणि आता एसीटीटी२ साठीही मार्गदर्शन करीत आहेत.

एसीटीटी २ अंतर्गत नोंदणी झालेल्या रुग्णांना दाखल करून घेताना त्यांचा कोरोना विषाणूचा संसर्ग प्रयोगशाळेत सिद्ध केला जातो. याशिवाय, त्यांच्या फुफ्फुसांमध्ये अडचणी असतात, श्वास घेताना आवाज निर्माण होतो, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा बाहेरून करावा लागतो. छातीच्या अस्वाभाविक एक्स-रेमध्ये न्युमोनिया दिसून येतो, किंवा त्यांना यांत्रिक व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. सर्व रुग्णांना दहा दिवसांपर्यंत रक्तवाहिन्यांमधून रेमडेसिव्हिर दिले जाते. निम्म्या रुग्णांना तोंडावाटे बॅरीसिटीनिब दिले जाते. उर्वरित रुग्णांना त्याचप्रकारचा प्लॅसिबो दिला जातो. दोन्ही औषधे १४ दिवसांपर्यंत दिली जातात.

रेमडेसिव्हिर ही जिलिएड सायन्सेस इंकने विकसित केली होती तर, बॅरीसिटीनिब ही एली लिली अॅण्ड कंपनीने विकसित केली होती.

हेही वाचा :'कोविड-१९'च्या रुग्णांमध्ये आढळली न्यूरोलॉजिकल लक्षणे..

ABOUT THE AUTHOR

...view details