न्यूयॉर्क : पेप्सिको आणि कोका-कोला, ( PepsiCo and Coca-Cola ) मॅकडोनाल्ड आणि चेन स्टारबक्ससह यूएस कंपन्यांनी रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करण्यासाठी रशियातील व्यवसाय तात्पुरते स्थगित ( suspending their business ) करण्याचा निर्णय घेतला आहे.
"युक्रेनमधील घटनांचा विचार करता आम्ही पेप्सी-कोला, आणि 7Up आणि मिरिंडाचे रशियामध्ये व्यवहार स्थगित करत आहोत. आम्ही भांडवली गुंतवणूक ( capital investments ) आणि जाहिराती ( advertising and promotional activities ) देखील स्थगित करत असल्याचे सीईओ रॅमन लग्वार्टा यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
काय म्हणते पेप्सीचे निवेदन
रशियन बाजारांमध्ये दूध आणि इतर डेअरी ऑफरिंग, बेबी फॉर्म्युला आणि बेबी फूड यासारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तू देणार आहे. कोका-कोला कंपनीने निवेदनात सांगितले की, 'रशियामधील आपला व्यवसाय निलंबित करत आहे. युक्रेनमधील घटनांमुळे आ्हाला दु:ख होत आहे.' दोन्ही यूएस ब्रँड लोकप्रिय कार्बोनेटेड पेये तयार करतात. PepsiCo पेप्सी-कोला, 7Up आणि मिरिंडा उत्पादन करते, तर कोका-कोला कंपनी कोका-कोला, स्प्राइट आणि फॅन्टा तयार करते. याचसोबत मॅकडी आणि स्टारबक्स अमेरिकन बहुराष्ट्रीय फास्ट फूड कॉर्पोरेशन मॅकडोनाल्डने देखील स्टारबक्स या कॉफी-हाऊस साखळीसह रशियामधील सर्व रेस्टॉरंटचे काम निलंबित करण्याची घोषणा केली.
हेही वाचा -Russia attacks Vinnytsia : युक्रेनच्या विनितसिया शहरावर रशियन क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला