महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

जर्मनीत अंदाधुंद गोळीबारात ८ जणांचा मृत्यू - हनाऊ जर्मनी गोळीबार

बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान गोळीबार झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

mass shooting file pic
संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 20, 2020, 8:21 AM IST

फ्रँकफर्ट - जर्मनीतील हनाऊ शहरामध्ये अंदाधुद गोळीबारात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी दोन हुक्का बारला लक्ष्य केले. या घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान गोळीबार झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गोळीबारानंतर मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. ओळख लपवण्यासाठी हल्लेखोरांनी कारला थर्मल फॉईलमध्ये गुंडाळले होते. एका ठिकाणी गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर कारने दुसऱ्या बारमध्ये गेले.

हनाऊ शहर फ्रँकफर्ट शहरापासून २० किमी दूर आहे. हनाऊ शहर हेसी राज्यामध्ये येत असून लोकसंख्या १ लाख आहे. शेजारील बव्हेरिया प्रांतील पोलीस मदतीसाठी मागवण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details