लंडन - मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती जर पाकिस्तानने २०११ला केली असती, तर भारताने पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई केली असती. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्याला तसे सांगितले होते असा खुलासा ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांनी केला आहे.
पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करण्यास मनमोहन सिंग होते सज्ज - कॅमरून - military action against Pakistan
५२ वर्षांच्या कॅमरून यांच्या वैयक्तिक तसेच राजकीय जीवनाचा संपूर्ण इतिहास, 'फॉर द रेकॉर्डस्' या त्यांच्या पुस्तकात लिहिला आहे. यामध्ये विशेषतः त्यांचा २०१० ते २०१६ पर्यंतचा कार्यकाळ देखील अधोरेखित करण्यात आला आहे. या दरम्यान त्यांचा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बराच संबंध आला होता.
![पाकिस्तानविरूद्ध लष्करी कारवाई करण्यास मनमोहन सिंग होते सज्ज - कॅमरून](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4492943-484-4492943-1568903717076.jpg)
David Cameron
Last Updated : Sep 19, 2019, 9:14 PM IST