लंडन - शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या लंडन ब्रिजवरील चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घाळून ठार केल्याचे स्कॉटलँड यार्ड पोलिसांनी म्हटले आहे. हा हल्ला दहशतवादी असल्याचे मानून तपास सुरू करण्यात आल्याचे स्कॉटलँड यार्डने माहिती दिली.
सध्या लंडन ब्रिज परिसरात कशी परिस्थिती आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे. लंडन रुग्णवाहिका सेवेने ही मोठी घटना असल्याचे जाहीर केले. लंडन ब्रिजवर काही लोक घाबरून पळत असल्याचे सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये दिसून आले आहे.
लंडन ब्रिजवरील वाहतूक बंद करण्यात आली. तसेच कार्यालये आणि इमारतीमध्ये लोक तिथेच अडकून पडले.